Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

बंडानंतर दादा भुसे मंत्रीही झाले.. तरी सध्या कमी बोलण्यावर भर!

Dada Bhuse यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर सविस्तर बोलणे टाळले.

Sampat Devgire

नाशिक : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मंत्रीमंडळात कृषीमंत्री (Agriculture Minister) असलेले दादा भुसे (Dada Bhuse) यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री एकनात शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रीपदाचे गिफ्ट दिले आहे. आम्ही जनतेची सेवा करू असे शपथविधीनंतर श्री. भुसे यांनी सांगितले.. (Minister Dada Bhuse avoids detail talk after oath ceremony)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार आज झाला. त्यात मालेगावचे दादा भुसे यांचा समावेष झाला आहे. शपथ घेतल्यावर श्री. भुसे यांना वाहिनीच्या पत्रकारांनी प्रतिक्रीया विचारली असता, या संधीचा उपयोग जनतेची सेवा करण्यासाठी करू, असे सांगतिले.

या मंत्रीमंडळात महिलांचा समावेष नाही. याबाबत शिवसेनेकडून टिका होत आहे, याकडे लक्ष वेधले असता त्यांनी बोलणे टाळले. सध्याचे सरकार डबल इंजिन सरकार आहे. त्यामुळे आता वेगाने काम करणार का? यावर देखील त्यांनी बोलण्याचे टाळले. एकंदरच बंडखोरी केल्यापासून मौन बाळगलेले भुसे शपथ घेतल्यावर देखील मौनच राहिले.

भुसेंना मिळाले गिफ्ट!

नाशिक जिल्ह्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खंदे समर्थक आणि आमदार दादा भुसे यांना मंत्रिपद नक्की असल्याचे मानले जात होते. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते. शिवाय मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी त्यांचे निकटचे, मैत्रिपूर्ण संबंध आहेत. श्री. भुसे कट्टर शिवसैनिक असले, तरी त्यांनी शिवसेनेवर कोणतीही टीका न करता शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

श्री. भुसे सलग चौथ्यांदा आमदार तसेच मंत्रिपदाचा दीर्घ अनुभव यामुळे त्यांचे मंत्रिपद निश्‍चित मानले जात होते. श्री. शिंदे यांच्याबरोबर असलेले नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्याही नावाची चर्चा होती. माजी मंत्री छगन भुजबळांना थेट विरोध करणारे आणि शिंदे यांच्या मर्जीतले म्हणून कांदे ओळखले जातात. त्यांना भविष्यात राज्यमंत्रिपद किंवा पालकमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT