Dada Bhuse
Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

दादा भुसे यांनी उद्धव ठाकरेंपुढे अन्नाची शपथ घेतली, अन् गद्दारी केली..

Sampat Devgire

कोल्हापूर : शिवसेनेचे (Shivsena) माजी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी बंडखोरी केली. त्या पूर्वसंध्येला मातोश्री येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांच्या उपस्थितीत आणि सौ. रश्मी वहिनींनी बनवलेल्या कांदेपोह्यांवर हात ठेऊन, `जोपर्यंत जीवंत आहे, शिवसेना सोडून जाणार नाही. गद्दारी करणार नाही. उद्धव ठाकरेंना सोडणार नाही, अशी शपथ घेतली होती. दुसऱ्या दिवशी शर्टाला हात पुसत गद्दारांच्या गटात गेले, असा किस्सा शिवसेना नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी सांगितला. (Shivsena rebel Dada Bhuse cheat Thakre family while joining rebel group)

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, हे बंडखोर आमदारांनो अरे या जन्मामध्ये कुठे फेडाल हे पाप? असा प्रश्न करीत राऊत यांनी बंडखोरांवर टिका केली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे आमदार फूटत होते, त्यावेळी माजी मंत्री दादा भुसे यांचा `मातोश्री`येथे घडलेला एक प्रसंग जसाच्या तसा सांगितला.

ते म्हणाले, शिवसेनेचे आमदार फुटत असल्याच्या बातम्या रोज कानावर येत होत्या. त्यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना बोलावून घेतले. संध्याकाळची वेळ होती. सात- साडे सात वाजले होते. रश्मी वहिनींनी तुलशीला दिवा लावला. भगवंतापुढे दिवा लावला. प्रार्थना केली आणि स्वतःच्या हाताने कांदे पोहे बनवले. सँडविच बनवले. उद्धव ठाकरे आणि दादा भुसे बसले होते, तीथे आणून ठेवले आणि म्हणाल्या, `दादा घ्या`.

श्री. राऊत पुढे म्हणाले, यावेळी रश्मी वहिनी म्हणाल्या, `दादा काय हो, मी ऐकतेय ते खरे आहे का?, तुम्ही सगळे जण साहेबांना सोडून जाताय?` दादा भुसे म्हणाले, `वहिनी साहेब, हे अन्न समोर आहे. या अन्नावर हात ठेवून शपथ घेऊन सांगतो की, या देहामध्ये जोपर्यंत जीव आहे, तोपर्यंत मी शिवसेना सोडून जाणार नाही. उद्धव साहेबांपासून दूर होणार नाही`. आणि दुसऱ्या दिवशी शर्टाला हात पुसत बंडखोरांच्या गटात गेले निघून. पक्षाशी गद्दारी करून निघून गेले.

श्री. राऊत म्हणाले, अहो जायचे आहे तर जा, पण सरळ सांगून जावे, होय आम्ही शिवसेना सोडली म्हणून. आज देखील तुम्ही बरळत आहात, आमची शिवसेना खरी. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन शिवसेना स्थापन करीत असताना तुमच्या खऱ्या बापाची का नाही आठवण करत. करा की खऱ्या बापाची आठवण. हिंदूह्रदयसम्राट आमचे पितामह आहेत. आमचे बाप आहेत. आमच्या बापाचे नाव घेण्याचा नैतीक अधिकार तुम्हाला नाही. आज जे काही शिवसेनेचे आहे, ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेले आहे. धनुष्यबाण आम्हाला निशानी मिळालेली आहे. ते आमच्या कर्तुत्वाने आणि बाळासाहेबांच्या आर्शिवादाने मिळालेले आहे. उद्धव ठाकरेंच्या प्रयत्नातून मिळाले आहे. शिवसेनेचा तो धनुष्यबाण चोरायचा प्रयत्न तुम्ही करीत आहात. बाळासाहेबांचे नाव चोरण्याचा प्रयत्न करीत आहात. प्रत्येक बंडखोरी केलेल्या आमदाराने आपआपल्या बापाचे नाव लावा आणि पक्ष काढा, बघा काय होतय का?.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT