Dr. Adway Hire & Followers Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Advay Hiray Arrested : अद्वय हिरे यांचा मुक्काम रात्रभर पोलिस ठाण्यात; समर्थकांचा गराडा

Sampat Devgire

Malegaon Shiv Sena Politics : शिवसेनेचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांना जिल्हा बँक कर्ज प्रकरणात भोपाळ येथून अटक करण्यात आली. त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. शिवसेना नेत्यांनी याबाबत राज्य सरकार द्वेषाचे राजकारण करीत आहे. त्याला योग्य वेळी तेवढेच दमदार उत्तर देऊ, असा इशारा दिला आहे. (Shivsena leaders criticize state Government and police on arrest action)

जिल्हा बँकेचे माजी संचालक तसेच शिवसेनेचे (Shivsena) उपनेते डॉ. अद्वय हिरे यांना काल पोलिसांच्या (Police) आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्यामुळे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) तसेच राज्य सरकरावर हिरे समर्थकांनी गंभीर आरोप केला आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जाच्या थकबाकीमुळे शिवसेना उपनेते डॉ. हिरे यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी त्यांना अटक केली. रेणुका सहकारी सूतगिरणीसाठी घेतलेले ७ कोटींचे कर्ज थकविल्याप्रकरणी जिल्हा बँकेने मालेगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. याबाबत डॉ. हिरे बेपत्ता झाले होते.

यासंदर्भात डॉ. हिरे यांना आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी भोपाळमधून (मध्य प्रदेश) ताब्यात घेतले होते. त्यांचा ट्रान्झीट रिमांड घेतल्यावर काल रात्री उशिरा त्यांना मालेगाव येथे आणण्यात आले. त्यानंतर रात्रभर त्यांचा मुक्काम पोलिस ठाण्यातच होता. या वेळी पोलिस ठाण्यात तसेच न्यायालयाच्या आवारात रात्रीदेखील समर्थकांची मोठी गर्दी होती.

पोलिसांनी ऐन दिवाळीत त्यांना अटक केली आहे. यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे आणि शिवसेनेचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांच्यातील तीव्र राजकीय संघर्षांची किनार या अटकेला आहे. त्यामुळे हिरे यांना पोलिस ठाण्यात आणल्यावर रात्री न्यायालयापुढे हजर करण्याचा निर्णय पोलिसांनी स्थगित केला. त्यांना सकाळी न्यायालयात नेण्यात येणार आहे. या वेळी न्यायालय तसेच पोलिस ठाण्याच्या आवारात हिरे समर्थकांची मोठी गर्दी होती. या गर्दीमुळे पोलिसावंरदेखील दबाव आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT