Nashik News: शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांना बुधवारी भोपाळमधून अटक करण्यात आली आहे. अद्वय हिरे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. पण या गुन्ह्यात ते पोलिसांना सापडत नव्हते. आता ऐन दिवाळीत पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. त्यामुळे नाशिकसह राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रेणुका सूतगिरणी संस्थेसाठी घेतलेले कर्ज थकविल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले जाते. या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे जिल्हा बँकेकडून त्यांना याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात आला. पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काही महिन्यांपूर्वीच अद्वय हिरे हे यांनी भाजपमधून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. अद्वय हिरे यांचे मालेगावात मोठं काम आहे. तसेच उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात हिरे कुटुंबाचं मोठं योगदान मानलं जातं. अद्वय हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे नाशिक-मालेगावच्या राजकारणाची काहीशी समीकरणं बदलली आहेत.
अद्वय हिरे हे मंत्री दादा भुसे यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. गेल्या काही दिवसांपासून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि अद्वय हिरे यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे, तर अद्वय हिरे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर अद्वय हिरे यांच्या समर्थकांनी ही कारवाई राजकीय सूडातून झाल्याचा आरोप केला आहे. सध्या अद्वय हिरे यांच्यावरील कारवाईमुळे नाशिकमध्ये चांगलच राजकारण तापलं आहे.
अद्वय हिरे हे शिवसेनेच्या ठाकरे गटात असून, ते सेनेचे उपनेते आहेत.
अद्वय हिरे हे नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत.
शिवसेनेतील फुटीनंतर अद्वय हिरेंनी ठाकरे गटात प्रवेश केला.
शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी ते भाजपमध्ये होते.
मंत्री दादा भुसे यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून हिरे यांची ओळख आहे.
Edited by : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.