Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Politics : न्यायालयीन सुनावणीआधी राऊत म्हणाले, ‘होय दादा भुसे भ्रष्ट मंत्री आहेत’

Dada Bhuse Vs Sanjay Raut politics, today Malegao court sanctions bail to raut-शिवसेना नेते राऊत यापूर्वी सुनावणीस गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरोधात कोर्टाने वॉरंट बजावले होते

Sampat Devgire

Shivsena Politics News : गिरणा सहकारी साखर कारखान्यासाठी संकलीत केलेल्या निधीच्या प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर गंभीर व अपहाराचा आरोप केला होता. यावरून झालेल्या आरोप, प्रत्यारोपावरून बदनामी झाल्याचा दावा करीत दादा भुसे यांनी हा वाद न्यायालयात नेला होता. (Shivsena Politics on high voltage in Dada Bhuse case)

मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात आब्रू नुकसानीचा दावा केला आहे. त्याची सुनावणी आज मालेगावात झाली. त्यासाठी खासदार राऊत न्यायालयात उपस्थित राहीले.

मालेगावचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी तेजवंतसिंग संधू यांच्या न्यायालयात या प्रकरणाची आज सुनावणी झाली. यावेळी राऊत यांच्या विरोधात यापूर्वी झालेल्या सुनावणीस गैरहजर राहिल्याने भुसे यांच्यावतीने आक्षेप घेण्यात आला होता. भुसे यांच्या वकिलांचा आरोप ग्राह्य धरून न्यायालयाने राऊत यांच्या विरोधात जामीनपात्र वाँरंट काढले होते.

यासंदर्भात न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट काढल्याने आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने खासदार राऊत यांच्या विनंतीवरून त्यांना ५० हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला. या खटल्याची पुढील सुनावणी येत्या ३ फेब्रुवारीला होणार आहे.

गिरणा साखर कारखाना प्रकरणात शेअर्ससाठी जमा केलेल्या निधीबाबत राऊत यांनी दादा भुसे यांच्यावर आरोप केले होते. यामध्ये आपली बदनामी झाल्याने भसे यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. या खटल्यात राऊत यांच्यावतीने अॅड. एम. वाय. काळे यांनी तर भुसे यांच्यावतीने अॅड. सुधीर अक्कर यांनी काम पाहिले. सुनावणीसाठी न्यायालयात शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

भुसेंवरील आरोपांचा पुनरूच्चार

दरम्यान या प्रकरणावर भाष्य करताना सकाळी खासदार राऊत यांनी नाशिक येथे दादा भुसे यांच्यावरील आरोपांचा पुनरूच्चार केला होता. ते म्हणाले, याबाबत भुसे यांनी जमा केलेल्या पैशांचे काय झाले, हे विचारण्याचा शेतकऱ्यांना अधिकार आहे. त्याबाबत प्रश्न विचारलातर अब्रू कशी जाते. भुसे सध्या सत्तेचा गैरवापर करीत आहेत. मालेगावच्या न्यायालयात आम्हीयाबाबतची वस्तुस्थिती व भूमिका मांडू.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT