Amravati News : अवकाळी पावसामुळं नुकसानाबाबत शासनानं आणखी गंभीर व्हावं!

Devendra Bhuyar : अमरावतीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांची सरकारकडे मागणी
MLA Devendra Bhuyar, Ajit Pawar, Eknath Shinde & Devendra Fadnavis.
MLA Devendra Bhuyar, Ajit Pawar, Eknath Shinde & Devendra Fadnavis.Google
Published on
Updated on

Unseasonal Rain : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळं अमरावती जिल्ह्यातील शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. अशात मोर्शी-वरुड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी या विषयाकडं सरकारनं अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज असल्याचं म्हटलंय.

मोर्शी-वरूड या दोन तालुक्यांमध्ये 27 ते 29 नोव्हेंबर यादरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट झाली. या नैसर्गिक संकटामुळं दोन्ही तालुक्यांतील शेतीला मोठा फटका बसलाय. (Independent MLA Of Morshi Warud Devendra Bhuyar Asks Government To Get More Serious On Damage Due to Unseasonal Rain & Hail Storm In Amravati)

MLA Devendra Bhuyar, Ajit Pawar, Eknath Shinde & Devendra Fadnavis.
Amravati Yashomati Thakur : ‘नुकसानग्रस्त’च्या यादीतून अमरावतीला वगळले

पावसामुळं मोर्शी-वरुड तालुक्यात झालेल्या नुकसानीचं तातडीनं सर्वेक्षण करणं गरजेचं झालंय. तत्काळ पंचनामे वेगानं करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली गेली पाहिजे, अशी मागणी आमदार भुयार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं केलीय. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी मोठ्या संकटचक्रात सापडलाय. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसामुळं कृषी क्षेत्राला फटका बसतोय. शेतात पिकलंच नाही तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार तरी कशी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी-वरूड तालुका विक्रमी संत्रा संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. संत्र्याचा आंबिया बहर घेणाऱ्यांच्या अडचणीत अवकाळी पावसामुळं भर पडलीय. संत्र्याच्या बागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं संत्रा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. शेतकऱ्यांनी सध्या आपल्या बागा ताणावर सोडल्या आहेत. आंबियाच्या नव्या फुटींवर परिणाम होणार आहे. याचा फटका केवळ अमरावतीमधीलच शेतकऱ्यांना बसेल असं नाही, तर प्रसंगी संत्र्याशी निगडित उद्योग, व्यवसाय आणि निर्यातीलाही बसणार आहे, असं भुयार यांचं म्हणणं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारने हिशोब केल्यास हा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात जाणारा आहे. आंबिया बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बागेचे पाणी बंद केले जाते. त्यानंतर 10 ते 15 जानेवारीपासून बागेला पाणी दिलं जातं. अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात फूलधारणा होण्यास सुरुवात होते. पावसामुळे हे व्यवस्थापन बिघडलंय, असं भुयार यांनी तीनही मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं. संत्र्यासोबतच गहू, हरभरा, तुर, मोसंबी यांचंही प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना तत्काळ मदत गरजेची आहे, असं भुयार यांनी म्हटलं आहे. अमरावती जिल्ह्याबाबत सरकारनं तातडीनं योग्य तो निर्णय घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.

Edited by : Prasannaa Jakate

MLA Devendra Bhuyar, Ajit Pawar, Eknath Shinde & Devendra Fadnavis.
Amravati Bacchu Kadu : विदर्भासाठी अधिवेशनात पाच दिवस पाहिजेच!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com