Dada Bhuse & Dr Apurv Hire Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr Apurva Hire Politics: दादा भुसे यांनी उद्धव ठाकरे पक्षाची केली कोंडी, उद्धव ठाकरे नवा पर्याय शोधणार का?

Dada Bhuse;Former MLA Apoorva Hiray is under investigation after Shiv Sena Uddhav Thackeray's deputy leader Advay Hiray -मालेगाव बाह्य मतदार संघात दादा भुसे यांचे पारंपारिक विरोधक अद्वय हिरे पाठोपाठ माजी आमदार अपूर्व हिरे अडचणीत

Sampat Devgire

Hire Vs Bhuse News: मालेगाव बाह्य मतदारसंघातील राजकारण वेगाने कलाटणी घेत आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची कोंडी करण्यात ते यशस्वी झाले.

मालेगाव बाह्य मतदारसंघावर प्रदीर्घकाळ हिरे कुटुंबीयांचा वरचष्मा राहिला होता. या आधारेच त्यांनी राज्याच्या राजकारणातही आपला ठसा उमटविला. मात्र राजकारणावरील ही पकड खिळखिळी करण्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यशस्वी झाले आहेत.

दोन दिवसांपूर्वी जिल्हा सहकार उपनिबंधकांनी माजी आमदार अपूर्व हिरे यांच्याशी संबंधित व्यंकटेश बँकेच्या कर्ज वाटप आणि वसुली यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. अशीच नोटीस योगिता अपूर्व हिरे यांच्याशी संबंधित महिला विकास बँकेला ही बजावण्यात आली. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या कुटुंबीयांची संबंधित हे प्रकरण आहे.

विधानसभा निवडणुकीच्या वर्षभर आधीपासून दादा भुसे यांनी सत्तेचा पुरेपूर वापर केला. विरोधक अद्वय हिरे यांच्या मागे पोलीस खटले आणि शैक्षणिक संस्थेच्या चौकशीचा ससेमीरा लावण्यात आला. यामध्ये अद्वय हिरे यांना तुरुंगातही जावे लागले. या प्रकरणातून अद्वय हिरे यांची त्यातून अद्याप सुटका झालेली नाही.

फौजदारी खटल्यांचा हा ससेमीरा अद्वय हिरे यांच्या पाठोपाठ माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या मागे सुरू झाला आहे. हिरे यांना या कायदेशीर जंजाळातून मार्ग काढण्यात गुंतून पडावे लागणार आहे. त्यामुळे आगामी सर्वच निवडणुकांसाठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते दादा भुसे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

विधानसभा निवडणुकीतच शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उद्धव ठाकरे पक्षाची कोंडी केली होती. अपक्ष उमेदवारी करणारे बंडू काका बच्छाव आणि हिरे यांच्यात उमेदवारीचा संघर्ष निर्माण झाला. बच्छाव यांनी अपक्ष उमेदवारी करून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. अद्वय हिरे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यातच मतदार संघाचे राजकीय चित्र स्पष्ट झाले होते.

सध्याच्या स्थितीत हिरे कुटुंबीय राजकीय आणि चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. अशा स्थितीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला नवा पर्याय शोधणे अपरिहार्य बनले आहे. उद्धव ठाकरे नवा पर्याय स्वीकारणार की पुन्हा एकदा हिरे यांच्यावरच बाजी लावणार याची उत्सुकता आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT