Sanjay Raut Politics: संजय राऊत यांचा आरोप, देवाभाऊंच्या ‘त्या’ जाहिरातींवर खर्च झाला ४० कोटींचा काळा पैसा?

Sanjay Raut; Black money of fifty crores utilised for Chief Minister Devendra Fadnavis advertisements-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा उजळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय वापर करणे थांबवा!
Devendra-Fadanvis-Sanjay-Raut
Devendra-Fadanvis-Sanjay-RautSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut on Fadnavis Ads News: शनिवारी राज्यभरात मुद्रीत माध्यमे, फ्लेक्स व अन्य माध्यमांतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर फुले वाहताना मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे. त्यावर फक्त ‘देवाभाऊ’ असा उल्लेख असल्याने त्यावरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

यासंदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे. या जाहिरातींवर ४० ते ५० कोटींचा खर्च झाला आहे. त्या जाहिरातीत प्रकाशकाचे नाव नाही. ज्याने जाहिराती दिल्या त्याने आपले नाव का लपवले, हे जनतेला समजले पाहिजे.

या जाहिरातींवर किमान ४० ते ५० कोटींचा खर्च झाला आहे.जाहिरातदार कोण? हे जाणीवपूर्वक लपवले आहे. त्यामुळे हा सर्व काळा पैसा खर्च झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयातून कोणाला काही सुचना दिल्या होत्या काय? याचा शोध घेतला गेला पाहिजे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

Devendra-Fadanvis-Sanjay-Raut
Nashik Ganesh Visarjan: पोलीस आयुक्तांची शिस्तीची सक्ती, मध्यरात्री बाराच्या ठोक्याला थांबला डीजेचा दणदणाट!

या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर मुख्यमंत्र्यांना आपल्या व्यक्तीगत राजकारणासाठी केला. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रणाम करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. मात्र ही जाहिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा उजळण्यासाठी करण्यात आली, हे खटकते.

मराठा आरक्षणाचा छत्रपती शिवाजी महाराजांशी काहीही संबंध नाही, असे राऊत म्हणाले. भाजप जातीय राजकारण करून शिवाजी महाराजांचे नाव खाली आणण्याचे काम करीत आहे. एव्हढेच प्रेम असेल तर अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारणार होतात, त्याचे काय झाले?. शिवाजी महाराजांची निती सर्वांना बरोबर घेऊन जाणे ही होती. भाजपने त्या विचाराला तिलांजली दिली आहे.

देवाभाऊंचा उदो उदो करण्यासाठी जाहिरातींचा खटाटोप केला आहे. आपला राजकीय उदो उदो करण्याचे काम त्यातून केले जात आहे. आपला गाजा वाजा करण्यासाठी छत्रपतींच्या पायावर फुले वाहिले जातात, याची नोंज जनता घेत असते. अशी जाहिरात देणारा कोण?, हा सर्व पैसा दोन नंबरची कामे करणाऱ्यांचा असावा, ही शंका येते.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com