Manoj Jarange  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange Speech: धनगर बांधवांनीही आरक्षणासाठी पेटून उठावं; जरांगे पाटलांची तोफ चौंडीत धडाडली

Dhangar Reservation News : जरांगे पाटील यांनी अहमदनगरच्या चौंडी येथील धनगर बांधवांच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली.

Ganesh Thombare

Ahmednagar News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात एकाचवेळी मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणावरून आंदोलनाची धग पेटली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या सत्ताधाऱ्यांना रोषाचा सामना करावा लागत आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला शेवटचा अल्टिमेटम दिलेला आहे.

आता जरांगे पाटील यांनी अहमदनगरच्या चौंडी येथील धनगर बांधवांच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावत "छाताडावर बसणार, पण आरक्षण सोडणार नाही", असा पुन्हा एकदा इशारा सरकारला दिला. तसेच धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही धनगर समाजाच्या मागे आहोत, असेही सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"मराठा समाजाला आरक्षणासाठी 40, तर धनगर आरक्षणाच्या मागणीला 50 दिवस दिले. मात्र, आता तुम्हाला सांगतो की, आपल्या मुलांना न्याय द्यायचा असेल तर सर्वसामान्य धनगरांनी पेटून उठले पाहिजे", असा सल्ला मनोज जरांगे यांनी मेळाव्यात बोलताना धनगर बांधवांना दिला.

"छाताडावर बसणार, पण आरक्षण सोडणार नाही, सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ", अशा थेट इशारा जरांगे पाटलांनी दिला. तसेच आरक्षणाची गरज का आहे, याबाबत सांगत आपल्या मुलांच्या वाट्याला कष्ट नको म्हणून आपल्याला आरक्षण हवे आहे, असे सांगत सरकारला आरक्षण द्यावेच लागेल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाने चौंडीमध्ये तब्बल 21 दिवस उपोषण केले होते. मात्र, राज्य सरकारने 50 दिवसांत अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असे लेखी आश्वासन यशवंत सेनेला दिले होते. याच पार्श्वभूमीवर सरकारला या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून सरकारने दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यात आली.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT