Dashrath Patil & Dinkar Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dashrath Patil Politics: `या` मतदारसंघात दोन सख्खे भाऊ देणार एकमेकांना टक्कर, कोण आहेत हे भाऊ?...

Dinkar Patil Join MMS and Brother Join Third Front: नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी केलेल्या दिनकर पाटील यांना भाऊ, माजी महापौर दशरथ पाटल यांनी दिले आव्हान.

Sampat Devgire

Nashik Political News: नाशिक पश्चिम मतदारसंघात भारतीय जनता पक्षात बंडखोरी झाली आहे. राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी नवीन नाही. मात्र या मतदारसंघात दोन सख्खे भाऊच एकमेकांना आव्हान देणार असल्याने तो चर्चेचा विषय आहे.

नाशिकच्या राजकारणात माजी महापौर दशरथ पाटील आणि माजी सभागृह नेते दिनकर पाटील हे दोघे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. पदोपदी त्याचे दर्शन घडत असते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अधिक हा संघर्ष अधिक टोकदार होणार आहे.

माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडाचे निशाण फडकवले होते. गुरुवारी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात प्रवेश केला. लगेचच पक्षाने त्यांना उमेदवारी देखील जाहीर केली.

या घटनेला चोविस तास होत नाहीत, तोच दिनकर पाटील यांना घरातूनच मोठे आव्हान मिळाले आहे. पाटील यांचे सख्खे भाऊ आणि माजी महापौर दशरथ पाटील यांनी आज छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षात प्रवेश केला. ते याच मतदारसंघातून आता तिसऱ्या आघाडीचे उमेदवार असतील.

या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने विद्यमान आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसह प्रचारात अतिशय तीव्र विरोधाचे वातावरण आहे.

गेले सहा महिने सत्तेच्या माध्यमातून शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांना सत्ताधारी पक्षाकडून टार्गेट करण्यात येत आहे. शहरातील हे टोकाचे राजकारण थोडे जास्तच झाले, अशी नागरिकांची प्रतिक्रीया आहे. त्यातच आता सातपूरच्या पाटील बंधूंनी उडी घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या राजकारणाला अतिशय वेगळे वळण मिळाले आहे.

माजी महापौर दशरथ पाटील आणि माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष शहराला नवा नाही. महापालिकेच्या 1997 मध्ये झालेल्या निवडणुकीत देखील हे दोघांनी भाऊ एकमेकांच्या विरोधात उमेदवारी केली होती. त्यावेळी दशरथ पाटील यांनी दिनकर पाटील यांचा पराभव केला होता.

त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या एवढेच या दोन भावांतील राजकीय प्रचार आणि आरोप प्रत्यारोप चर्चेत असेल. या निमित्ताने हा मतदारसंघ राज्यभर चर्चेचा विषय ठरणार आहे. यानिमित्ताने मनसे आणि तिसरी आघाडी या दोघांनाही आयतेच उमेदवार मिळाले आहेत. त्यामुळे देखील या पक्षांची चर्चा होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT