Eknath Khadse & Raksha Khadse
Eknath Khadse & Raksha Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse; सासरे खडसेंच्या विरोधात सुन रक्षा खडसे प्रचाराच्या मैदानात

Sampat Devgire

जळगाव : जिल्हा (Jalgaon) दूध संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या विरोधात भाजपचे (BJP) दोन मंत्री उभे ठाकले आहे. भाजपच्या या नेत्यांना खडसे (Raksha Khadse) यांची सुन, खासदार रक्षा खडसे यांचीही रसद मिळाली आहे. खासदार रक्षा खडसे सासु व सासरा यांच्या विरोधात प्रचार करीत असल्याने ही सहकारी संघाची निवडणूक चर्चेचा विषय बनली आहे. (Jalgaon district milk fedration election campaign on peak)

जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीत आता प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे. सासू-सासऱ्यांच्या पॅनलविरुद्ध सुनेचा प्रचार सुरू असल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनाच्या महाविकास आघाडीचे एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल आहे, तर भाजप-शिंदे गटप्रणीत मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनल आहे. श्री. खडसे यांच्या सून रक्षा खडसे या भाजपच्या खासदार असून, त्या भाजपप्रणीत पॅनलचा प्रचार करीत आहेत.

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या सहकार पॅनलविरुद्ध मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्यात लढत आहे. दोन्ही पॅनलचा जोरदार प्रचार सुरू आहे.

एकनाथ खडसे प्रत्यक्ष मैदानात नाहीत. मात्र, त्यांच्या पत्नी व जिल्हा दूध संघाच्या विद्यमान अध्यक्षा मंदाकिनी खडसे मैदानात आहेत. एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला राम-राम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला, तरी त्यांच्या सून रक्षा खडसे भाजपमध्येच आहेत. त्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. जिल्हा दूध संघात सासू मंदाकिनी खडसे व सासरे एकनाथ खडसे यांचे सहकार पॅनल आहे. त्या पॅनलविरुद्ध त्या भाजप-शिंदे गटाच्या मंत्री गिरीश महाजन व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनलचा प्रचार करीत आहेत.

मुक्ताईनगर मतदारसंघात शेतकरी पॅनलच्या झालेल्या मेळाव्यात खासदार रक्षा खडसे म्हणाल्या, की मला सहकार क्षेत्राचा जास्त अनुभव नसल्याने त्यासंदर्भात मला जास्त बोलता येणार नाही. शेतकऱ्यांना मजबूत करायचे असेल, तर एक चांगले व्यवस्थापन जिल्हा दूध संघावर देणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी विकास पॅनलला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT