Bala Kokane sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिवसेनेचे बाळा कोकणेवर प्राणघातक हल्ला

मध्यरात्री अज्ञात हल्लेखोराकंडून सशस्त्र हल्ला झाल्याने खळबळ

Sampat Devgire

नाशिक : शिवसेनेचे (Shivsena) नाशिक (Nashik) मध्य विधानसभा प्रमुख बाळा कोकणे (Bala kokna) यांच्यावर काल मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस (Police) हल्लेखोरांचा शोध घेत आहे. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला की कसे याची चर्चा सुरु आहे. (Unidentified persons attacked on Bala Kokane)

दरम्यान मध्यरात्री बाराला शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या महात्मा गांघी रोडवर श्री. कोकणे जात होते. तेव्हा मागून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर मागुन येऊन हल्ला केला. श्री. कोकणे यामध्ये जबर जखमी झाले. त्यांना सिद्धीविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी तातडीने रुग्णालयात जाऊन श्री. कोकणे यांच्याकडून माहिती घेतली. त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. पोलिस सीसीडीव्ही फुटेजची तपासणी करीत आहेत.

सध्या राज्यात शिवसेनेंतर्गत राजकीय घडामोडींची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. त्यामुळे या घटनेचा राजकीय संबंध आहे काय, याबाबत पोलिसांनी तपास करावा. हल्लेखोरांना तातडीने अटक करून कारवाई करावी, अशी मागणी श्री. कोकणे यांनी केली.

असा झाला हल्ला...

शहरातील एम. जी. रोडवर शिवसेनेचे बाळा कोकणे यांच्यावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला. संशयितांनी हल्ला करून पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळा कोकणे हे सोमवारी (ता. १८) रात्री अकराच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून जात होते. एम. जी. रोडवरील यशवंत व्यायामशाळेसमोरून जात असताना, त्यांच्यावर पाठीमागून अचानक हल्ला झाला. त्यांच्या डोक्यावर हत्याराने वार केल्याने ते रक्तबंबाळ झाले. त्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. जखमी कोकणे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT