Shiv Sena : ठाकरेंना शिवसेना भवनातून हटविण्याचा शिंदे यांचा प्लॅन

शिवसेनेतील खासदारही बंडाच्या पवित्र्यात आहेत.
Uddhav Thackeray Latest Marathi News, Eknath Shinde Latest News, Shiv Sena Latest News
Uddhav Thackeray Latest Marathi News, Eknath Shinde Latest News, Shiv Sena Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. चाळीस आमदारांच्या बंडानंतर खासदारांकडूनही बंडाचे हत्यार उपसले जाण्याची दाट शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट 'शिवसेना भवन'वरच ताबा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे समजते. (Shiv Sena Latest Marathi News)

दादर येथे पक्षाचे मुख्यालय असलेल्या शिवसेना भवनात शिंदे यांचं वर्चस्व राहणार की ठाकरेंचा याचे उत्तर पुढील काही दिवसांतच मिळू शकेल. बुधवारी सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेने दाखल केलेल्या विविध याचिकांवर सुनावणी आहे. त्यावर शिवसेनेचे आणि शिंदे सरकारच्या अस्तित्वाचा फैसला होऊ शकतो.

Uddhav Thackeray Latest Marathi News, Eknath Shinde Latest News, Shiv Sena Latest News
Eknath Shinde |एकनाथ शिंदे मध्यरात्री दिल्लीत दाखल; खासदारांसोबत 'डिनर डिप्लोमसी'

न्यायालयात सुनावणी होण्याआधीच शिंदे यांनी मोठी खेळी केली आहे. सध्याची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करत नव्या कार्यकारिणीची घोषणा त्यांनी केली आहे. पण पक्षप्रमुख म्हणून ठाकरे यांनाच कायम ठेवले आहे. तर मुख्य नेतेपद स्वत:कडे ठेवले आहे. तर आता खासदारही बंडाच्या पवित्र्यात आहेत.

आमदार, खासदारांसह आता गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांना गटात सामावून घेण्याची जोरदार मोहीम सुरू केली आहे. अनेक जिल्ह्यांतून त्यांना पाठिंबाही वाढत चालला आहे. ठाकरेंनी हकालपट्टी केलेल्या नेत्यांना त्याच पदावर नियुक्ती दिली जात आहे. ठाकरेंवर नाराज असलेल्या नेत्यांना पदं दिली जात आहेत. माजी आमदार, माजी खासदार, जिल्हाप्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे शिंदे यांनी आता संपूर्ण शिवसेनाच ताब्यात घेण्यासाठी पावले टाकण्यास सुरूवात केली आहे.

Uddhav Thackeray Latest Marathi News, Eknath Shinde Latest News, Shiv Sena Latest News
Congress : भाजप नेत्यांचं भाकित खरं ठरलं; मुर्मूंना मत दिल्याचं काँग्रेस आमदारांनं केलं जाहीर

लोकसभेत वेगळा गट करणार?

शिवसेनेचे बारा खासदार लोकसभेत वेगळा गट करण्याची शक्यता आहे. हे खासदार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान मोदींनाही भेटणार असल्याचे समजते. त्यामुळे राज्यानंतर ठाकरेंना दिल्लीतही धक्का बसण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com