Deepak Pandey Latest News Updates
Deepak Pandey Latest News Updates Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

बदली झालेले आयुक्त दीपक पांडे म्हणाले, `मी बेहद्द खुष`

Sampat Devgire

नाशिक : नाशिक शहर (Nashik City) पोलिस आयुक्त म्हणून सतरा महिने मिळालेल्या कालावधीत केलेले काम आणि निर्णयावर मी प्रचंड समाधानी असून या काळात अनेक चांगले निर्णय घेतले असल्याचे मत नाशिक शहर पोलिस आयुक्त (Police) दीपक पांडे (Deepak Pande) यांनी केले. (Deepak Pandey Latest News Updates)

नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची मुंबईत राज्याच्या महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. गुरुवारी पोलिस आयुक्तालयात त्यांनी आपल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा निरोप घेत कामगिरीवर समाधानी असल्याचे सांगत पुढील आयुक्तांना देखील माझ्याप्रमाणेच मदत करण्याचे आवाहन देखील केले.

नाशिक पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर दीपक पांडे यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक चांगले उपक्रम राबविले. यात कोरोनामध्ये त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांचे स्वास्थ जपत त्यांचे मनोबल उंचावले. त्यानंतर आंनदवल्ली येथे शेतकऱ्याचा झालेला खुनाचा छडा लावला. यात मोठ्या प्रमाणात भूमाफिया सहभागी असल्याने त्यांनी प्रथम भूमाफिया यांच्यावर मोक्कातंर्गत कारवाई केली. राज्यात भूमाफियावर पहिल्यांदाच अशी कारवाई झाली. त्यानंतर शहरातील भाईगिरी मोडीत काढण्यासाठी अनेक संघटित टोळ्यांवर मोक्याची कारवाई केली.

बेशिस्त वाहनचालक यांच्यावर लगाम बसावा म्हणून हेल्मेटसक्ती, नो हेल्मेट नो पेट्रोल असे उपक्रम राबविले. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर नाशिक शहरात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी यावर देखील ठोस कारवाई केली. त्यामुळे ते राज्यभर चांगलेच चर्चेत आले. त्यानंतर त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना अधिकारावरून लेटर बॉम्ब टाकला. यावरुन त्यांच्यावर टिकेची झोड देखील उठविली. यानंतर भोंगे बाबत देखील त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडल्यानंतर त्याची दखल राज्य सरकारने देखील घेतली. भोंगेबाबत आणि महसूल नियमासंदर्भात केलेल्या पत्रव्यवहारासंदर्भात आपण आजही ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात यावर राज्य व केंद्र नक्कीच आपला नियम बदलतील, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली.

आपल्या नाशिकमध्ये सेवा करण्याची संधी मिळाल्यानंतर आपल्या आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिल्याचे सांगत त्यांनी आपण आपल्या कामगिरीवर खूप समाधानी असल्याचे सांगत आता महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. तिथे देखील आपण चांगलेच काम करणार.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT