नाशिक : मराठा (Maratha) समाजातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. शेतकरी (Farmers) मुलांना लग्नासाठी मुली (Brides) द्यायला तयार नाहीत. त्यामुळे भविष्यात मोठी अराजकता (this is a sign of serious Chaos) माजण्याची चिन्हे आहेत. यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार नितीन भोसले (Nitin Bhosale) यांनी केले. (Nitin Bhosale Latest News Updates)
मराठा सेवा संघ वधू- वर व पालक परिचय मेळावा नाशिक येथील कालिका मंदिर हॉल येथे आयोजित केला होता. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरवात जिजाऊ वंदनाने तसेच तनुश्री वाकचौरे यांच्या शिव व्याख्यानाने झाली. उपवनसंरक्षक पी. एन. पाटील उद्घाटक, तर मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष के. डी. पाटील अध्यक्षस्थानी होते. या वेळी नवलनाथ तांबे, आर. आर. पाटील, वधू-वर कक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी. टी. देवरे, जिल्हाध्यक्ष उषा पाटील, संजय पाटील, एस. आर. पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे, विभागीय अध्यक्ष वैशाली डुंबरे, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे, सी. एन. देसले, कार्याध्यक्ष प्रमोद आहेरराव, संघटक नितीन मगर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र निंबाळते, जितेंद्र पाटील, नितीन पाटील, रमेश काकुळते, उदय बोरसे, अरुण पाटील, विशाल कृष्णदेव देसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
वधूवर कक्षाचे श्री. देवरे यांनी वधू-वर व त्यांच्या पालकांनी कुंडलीवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवत मुला- मुलींच्या शैक्षणिक अनुरूपतेनुसार विवाह जोडली पाहिजेत. कुंडलीच्या नादी लागल्याने अनेक चांगली स्थळ हुकून जात असल्याचे सांगितले. विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे यांनी शेती करणाऱ्या विवाहयोग्य मुलांसाठी मोफत समुपदेशन केंद्र व नोंदणी सुरू करणार असल्याचे सांगितले.
अध्यक्ष के. डी. पाटील यांनी लग्न सोहळ्यावर होणारा अनाठायी खर्च घातक असल्याचे सांगत नागरिकांनी सामाजिक दृष्टिकोन ठेवत या लग्नखर्चाचा उपयोग विधायक कामासाठी लावावा असे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष राजेंद्र निंबाळते यांनी मराठा सेवा संघाची वाटचाल सर्वच पातळीवर सुरू असून, ३२ कक्षाच्या माध्यमातून जिल्हाभर कक्ष बांधणी सुरू असल्याचे सांगितले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते वधू-वर पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.