Pankaja Munde, Devendra Fadnavis News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pankaja Munday News : पंकजांची नाराजी दूर? फडणवीस-मुंडेंचा एकाच गाडीतून प्रवास...

Bjp News : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा रंगली होती.

सरकारनामा ब्यूरो

Devendra Fadnavis News : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी बीडमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावली नव्हती. त्यावरुन त्या फडणवीस यांच्यावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, आज नाशिकमध्ये दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला.

भाजप (BJP) प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक नाशिकमध्ये होत आहे. या बैठकीच्या निमित्ताने लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर चर्चा झाली. तसेच अगामी निवडणुकांसाठी रणनिती ठरली आहे. या कार्यकारीनीच्या बैठकीला भाजपचे अनेक नेते उपस्थित आहेत.

बैठकीला येताना मुंडे-फडणवीस एकाच गाडीतून आले. याबाबत पंकजा यांना विचारले असता, आम्ही एकाच हॉटेलमध्ये थांबलो होतो. माझी गाडी मागे होती. त्यांची गाडी पुढे लागली होती. त्यामुळे आम्ही एकाच गाडीतून आलो, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले.

मी बैठकीत उपस्थित होते. मी कोअर कमिटीमध्ये आहे. भाजपची राष्ट्रीय सचिव आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची नियमानुसार राज्याची कार्यकारणी व्हायला पाहिजे, ती कार्यकारणी झाली. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) प्रदेशाध्य झाल्यापासून झाल्यापासून पहिल्यांदाच ही कार्यकारणी झाली. अनेक विषयांवर कार्यकारीनीमध्ये चर्चा झाली, अजून काही विषयांवर चर्चा होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीमध्ये राजकीय प्रस्तावांवर चर्चा झाली. याशिवाय युवा वारियर्स असतील, बूथ रचना असेल या विविध कार्यक्रमांबद्दल चर्चा झाली आहे. युवा मोर्चा कसा जास्तीत जास्त सक्रिय व्हावा किंवा युवा वर्ग कसा मतदार आमच्याकडे आकर्षित व्हावा याच्यासाठी पक्षाने काय करावे, यावर चर्चा झाली, असे पंकजा यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT