Ajit Pawar : भुमरेंच्या दारू दुकानांचा अजित पवारांकडूनही उल्लेख, म्हणाले एकनाथ महाराजांना काय वाटेल ?

Paithan : ठाकरेंच्या नावाने एकदा नाही, पाचदा निवडून येता आणि त्यांच्याच मुलाला खाली खेचतांना लाज वाटत नाही का?
Sandipan Bhumre-Ajit Pawar news, Aurangabad
Sandipan Bhumre-Ajit Pawar news, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Ncp : दोन दिवसांपुर्वी युवासनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी बिडकीनच्या शिवसंवाद मेळाव्यात पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या १२ वाईन शाॅपचा उल्लेख करत टीका केली होती. त्यानंतर आजा राष्ट्रवादीच्या शेतकरी मेळाव्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील भुमरेंना सुनावले.

Sandipan Bhumre-Ajit Pawar news, Aurangabad
Rajesh Tope News : त्यांना म्हणायचे होते `संत` एकनाथ, पण घोळ झाला..

पैठणमध्ये एमआयडीसी, काॅलेज, ज्ञानेश्वर उद्यान, जायकवाडी धरण, साखर कारखाने हे राष्ट्रवादी (Ncp) आणि काॅंग्रेसने आणले आहेत. मग पाचवेळा निवडून आलेल्या भुमरेंनी काय केले? फक्त दारूची दुकानं काढली, त्याच्यासोमर स्पीड ब्रेकर टाकले जेणेकरून गाडी हळू करून लोकांचे लक्ष जावे आणि त्यांनी थोडी टाकून पुढे जावे. अरे हे काय चाललंय, एकनाथ महाराजांना काय वाटेल? अशा शब्दात अजित पवारांनी (Ajit Pawar) भुमरेंना टोला लगावला.

तरुण पिढीला बरबाद करण्याचे पाप करू नका, असे आवाहन देखील त्यांनी केले. पैठण येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात अजित पवार यांनी शिंदे गट आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. भुमरे यांनी नऊ दारूची दुकाने काढली, असा आरोप करत पवारांनी भुमरेंना सुनावले.

अजित पवार म्हणाले, या मतदारसंघात जायकवाडी धरण, दोन सहकारी कारखाने, संत ज्ञानेश्वर उद्यान, एमआयडीसी, दोन काॅलेज हे सगळं राष्ट्रवादी आणि काँग्रेसने दिले आहे. मग प्रश्न असा पडतो भुमरेंनी पाचवेळा निवडून येवून काय केले ? पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी साखर कारखाने हिसकावून घेतले अशी टीका करता, पण ते चालवण्यासाठी तुमच्यात दम नाही, तुमच्या इथे पाणी आहे, पण तुमच्या लोकप्रतिनिधींमध्ये धमक नाही.

त्यामुळे लोकांनी देखील आता आमदार निवडून देतांना विचार केला पाहिजे. चुकीचा आमदार निवडला तर मतदारसंघाच वाटोळं होत, असेही पवार म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने एकदा नाही, पाचदा निवडून येता आणि त्यांच्याच मुलाला खाली खेचतांना लाज वाटत नाही का?

Sandipan Bhumre-Ajit Pawar news, Aurangabad
Ajit Pawar News : नऊ महिन्यात बाळ जन्माला येतं, यांना मंत्रीमंडळ विस्तार करता येईना..

राज्यात झालेली गद्दारी लोकांना पटलेली नाही म्हणून शिक्षक पदवीधरमध्ये लोकांनी मतांमधून तुम्हाला हिसका दाखवला, असा टोला देखील त्यांनी लगावला. चाळीस आमदरांच्या वाय प्लस सुरक्षेवर महिन्याला एकावर वीस लाख रुपये खर्च होत आहे. तर दुसरीकडे सामान्यांवर हल्ले होत आहेत, मग जनतेचे रक्षण कोण करणार? असा सवाल देखील अजित पवारांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com