Aditya Thackeray & Devendra Fadanvis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena News : महापालिकेची सत्ता देऊनही फडणवीसांनी विकास केला नाही!

Devendra Fadanvis not able to resolve Nashik city issues-आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकचा विकास करण्यात अपयशी ठरले अशी टिका केली.

Sampat Devgire

Aditya Thackeray On Devendra Fadanvis : नाशिकच्या मतदारांनी भारतीय जनता पक्षाला महापालिकेची सत्ता दिली. या सत्तेचा उपयोग त्यांनी कोणासाठी केला?. देवेंद्र फडणवीस यांनी हे शहर दत्तक घेतले होते, मात्र ते येथे काहीही विकास करू शकलेले नाहीत, अशी टिका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली. (For whom did BJP use the power in Nashik Municiple corporation)

शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आपल्या नाशिकच्या (Nashik) दौऱ्यात नाशिक महापालिकेच्या (NMC) कामकाजाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टिका केली. फडणवीस यांनी काहीही विकास केलेला नाही, आरोप त्यांनी केला.

नाशिक महापालिकेची सत्ता मिळावी म्हणून भाजपने अनेक घोषणा केल्या. त्या प्रत्यक्षात आल्यात का? अशी विचारणा ठाकरे यांनी केली. विकासाच्या बाबतीत शहराला पुढे नेण्यासाठी नेतृत्वाची आवश्‍यकता असते. परंतु दुर्दैवाने नाशिकला तसे नेतृत्व मिळाले नाही. नाशिक दत्तक घेणारे पिता बहुमताने सत्ता देवूनही विकास करू शकले नाही, असा आरोप करीत ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले.

शाश्वत विकास या विषयावर युवकांना थेट प्रश्न विचारण्यासाठी ‘यंग इंडिया’ संस्थेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. नाशिकमध्ये बहुमत असताना शहराचा विकास झाला नाही. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून महाराष्ट्रात निवडणुका नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडे उत्तर मागायचे कोणी, असा सवाल देखील ठाकरे यांनी केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होण्यामागे सरकार कारणीभूत असल्याचे अंगुलिनिर्देश केला. प्रश्न विचारणारा लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासन मस्त आहे. अधिकाऱ्यांवर कारवाई नाही. शाश्वत विकासावर चर्चा करताना मागील पन्नास वर्षांच्या चुका किंवा निर्णय योग्य की अयोग्य यावर चर्चाच होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT