Pune Shivsena UBT : कसबा, कोथरूडसह चार जागांवर जिंकू; पुण्यातील ठाकरे गटाचा विश्वास

Vidhansabha Election : निवडणुकीसाठी पुण्यातील ठाकरे गटाची 'मातोश्री'वर आढावा बैठक
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pune News : निवडणुका जवळ येतील तशी महायुती आणि महाविकास आघाडीतील चुरस वाढत आहे. मात्र या दोन्ही गटांतर्गतही विविध जागांवर दावा सांगण्याची स्पर्धा असल्याचेही दिसून येते. महाविकास आघाडीतील काँग्रेस राज्यातील लोकसभा मतदारसंघावर दावा करीत सुटले असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाने विधानसभेच्या पुण्यातील कसब्यासह चार जागांवर हक्क सांगितला आहे. त्यामुळे आघाडीत जागावाटपाचे सूत्र ठरण्यापूर्वीच दावा सांगण्याच्या स्पर्धेतून कार्यकर्ते आमने-सामने याताना दिसत आहेत. परिणामी राजकीय वातावरण तापत चालले आहे. (Latest Political News)

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी राहिली तर ठाकरे गटाला कोथरूड, हडपसर, वडगावशेरी आणि कसबा हे चार विधानसभा मतदारसंघ मिळाले पाहिजेत. या ठिकाणी उमेदवार निवडून आणू शकतो, असा दावा शहरातील पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात पुण्यात गटप्रमुखांचा मेळावा घेणार असल्याचे ठाकरेंनी या बैठकीत स्पष्ट केले आहे. या बैठकीत ठाकरे काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

Uddhav Thackeray
BJP In Rajasthan : भाजपचं राजस्थानमध्ये चाललंय काय! वसुंधरा राजेंकडे दुर्लक्ष...

उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पुण्यातील पदाधिकाऱ्यांची मुंबईत मातोश्री येथे बैठक घेतली. यावेळी संपर्कप्रमुख सचिन आहिर, शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेवक अशोक हरणावळ, विशाल धनवडे आदी उपस्थित होते. ठाकरेंनी पुणे लोकसभेसह शहरातील आठ विधानसभा मतदारसंघ आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षबांधणीवर चर्चा केली. गटप्रमुखांच्या नियुक्त्या, प्रभागनिहाय, विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचा आढावा घेतला. फूट पडल्यानंतर शिवसेनेचे पुण्यातील मोजके पदाधिकारी शिंदेंसोबत गेले, पण बहुतांश कार्यकर्ते, माजी नगरसेवक हे आपल्यासोबत असल्याचेही समाधान ठाकरेंनी व्यक्त केले.

Uddhav Thackeray
Ahmednagar News : कांदा निर्यातीवर 40 टक्के कर ! 'स्वाभिमानी' संतापली...रविवारी राहुरीत तीव्र आंदोलन...

यावेळी झालेल्या चर्चेत आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी झाली नाही तर सर्व आठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यास आपण तयार आहोत, त्यादृष्टीने संघटनेची बांधणी केली जात आहे. जर आघाडी झाली तर कोथरूड, वडगावशेरी, हडपसर आणि कसबा हे चार विधानसभा मतदारसंघात आपली ताकद चांगली आहे, त्यामुळे या जागा आपल्याला मिळाल्या पाहिजेत अशी मागणी ठाकरेंकडे केली आहे, असे मोरे यांनी सांगितले.

...अन् संजय मोरेंची इच्छ पूर्ण

गेल्यावर्षी उद्योगमंत्री उदय सामंतांच्या वाहनावर पुण्यात हल्ल्याच्या आरोपाखाली ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह सहा जणांना अटक झाली होती. पोलिसांनी या शिवसैनिकांच्या हातातील शिवबंधन काढले होते. त्यानंतर मोरेंनी उद्धव ठाकरे यांच्या हातूनच शिवबंधन बांधून घेणार असल्याची इच्छा व्यक्त केली होती. वर्षभरात मोरे मातोश्रीवर अनेकदा गेले पण तसा योग आला नाही. दरम्यान, शनिवारच्या बैठकीत ही बाबत ठाकरेंना समजली. त्यानंतर त्यांनी मोरे यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून ‘असेच लढत रहा, मी सोबत आहे’, अशी शाबासकी दिली.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com