Devendra fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis : शिक्षणमंत्री होणार की नाही? दिल्ली दौऱ्याहून महाराष्ट्रात परतलेल्या फडणवीसांनी अखेर मौन सोडलं; म्हणाले...

Devendra Fadnavis Visit Delhi : धर्मेंद्र प्रधान यांच्या जागेवर नवे शिक्षणमंत्री म्हणून फडणवीसांची नियुक्ती होऊ शकते अशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु झाल्या आहेत. फडणवीसांनी काल तातडीने दिल्ली गाठल्याने या चर्चा सुरु झाल्या.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनापुढे काल केंद्र सरकार झुकले, विद्यार्थ्यांच्या तीन्ही मागण्या सरकारने मान्य केल्या. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले होते. त्यामुळे प्रधान यांच्या जागेवर नवे शिक्षणमंत्री म्हणून फडणवीसांची नियुक्ती होऊ शकते अशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु झाल्या.

ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तसा दावा सर्व प्रथम केला. देशाचे नवे शिक्षणमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते असं राऊतांनी म्हटलं.

फडणवीसांनी काल तत्काळ दिल्ली गाठत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. मात्र, त्यांनी नेमकी भाजपच्या कोणत्या वरिष्ठ नेत्याची भेट घेतली, कुणाशी चर्चा केली याबाबत मात्र कमालीची गुप्तता बाळगण्यात आल्याचं दिसत आहे. कारण त्यांची पक्षातील वरिष्ठांशी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही. त्यांना नक्की कशासाठी दिल्लीला बोलावून घेतलं होतं हेही समजू शकलेलं नाही.

त्यामुळे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात असताना आता दिल्लीतून पुन्हा महाराष्ट्रात परतलेल्या फडणवीसांनीच माध्यमांशी बोलताना यासंदर्भात सूचक भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाण्याच्या चर्चांवरती अलगद पडदा टाकला. ते कुठेही जाणार नसून मुंबईत आणि महाराष्ट्रातच राहणार असल्याचे त्यांनी सुतोवाच केले आहे.

फडणवीस म्हणाले, "मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईत जाणार आहे. मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच राहणार आहे", अस त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

ठाकरे बंधूंवर टीका

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं, त्यासाठी ठाकरे बंधूंनी मुंबईत विजयी सेलिब्रेशन केलं त्यावर यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, चला काही हरकत नाही त्यांना सेलिब्रेशन करता काहीतरी कारण मिळालं याचा मला आनंद आहे, आणि आम्ही देखील आनंदी आहोत.

शेवटी असे प्रश्न हे कुठल्याही व्यक्तीचे किंवा कुठल्या पक्षाचे प्रश्न नसतात. तर हे देशातील तरुणांना भेडसावणारे प्रश्न आहेत. त्यामुळे त्या संदर्भात देशाचे पंतप्रधान असलेल्या मोदीजींनी संवेदनशीलता दाखवत निर्णय केलेले आहेत. देशाचं हित महत्त्वाचं असतं. ते लक्षात ठेवून अशा परिस्थितीमध्ये जे काही निर्णय करणं आवश्यक होतं. ते सगळे निर्णय मोदीजींनी केल्यांच फडणवीस म्हणाले.

आता सोमवारी विधेयक देखील लोकसभेमध्ये मांडलं जाणार आहे, ज्यातून पुढच्या काळामध्ये देशातील तरुणाईचे जे भवितव्य आहे, हे सुरक्षित राहण्याकरता कठोरतम कायदा हा देशाच्या आणि जगाच्या इतिहासात असा कायदा कुठेच झालेला नाही, असा कायदा करण्याचा जो काही निर्णय केलेला आहे. मी त्यासाठी खरोखर मोदीजींचे त्याबद्दल आभार मानतो असं फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT