Devendra Fadnavis : अमृतावहिनींच्या ‘त्या’ विधानानंतर अवघ्या 8 तासांतच देवेंद्र फडणवीस दिल्लीत!

Amruta Fadnavis Statement : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा वेग आला आहे. अमृता फडणवीस यांच्या विधानानंतर या दौऱ्याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.
Devendra Fadnavis-Amruta Fadnavis
Devendra Fadnavis-Amruta FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 25 July : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, त्यांना केंद्रात बढती मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याबाबत खुद्द फडणवीस यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. पण त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पंढरपुरात माध्यमांशी बोलताना ‘मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार’ असे विधान आठ तासांपूर्वी केले होते. त्यानंतर अवघ्या आठ तासांतच मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत, त्यामुळे दिल्लीत नव्या कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली. त्या पुजेनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी मला महाराष्ट्रातच राहायचं आहे, त्यामुळे मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, असे म्हटले होते.

दिल्लीत सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या गेल्या २८ दिवसांपासूनच्या आंदोलनाला आज अखेर यश आले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे.

इकडे देवेंद्र फडणवीस हे विठ्ठलाची शासकीय महापूजा संपवून पंढरपूरहून मुंबईत दाखल झाले. पण त्यानंतर ते तातडीने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा, केंद्रीय मंत्री प्रधान यांनी दिलेला राजीनामा आणि अमृता फडणवीस यांचे ते विधान, त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय तर्कविर्तकांना उधाण आले आहे.

Devendra Fadnavis-Amruta Fadnavis
Sharad Pawar On Pradhan : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया : ‘लोकशाहीने कात टाकली...युवा पिढीला श्रेय’

गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार असल्याची चर्चा होती. त्यावेळी त्यांच्या अर्थमंत्रिपदाबाबतची चर्चा होती. मात्र ती आजपर्यंत तरी चर्चा राहिली होती. सध्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्रिपद रिक्त झाले आहे, त्यामुळे त्या पदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Devendra Fadnavis-Amruta Fadnavis
Solapur Dcc Bank : सोलापूर डीसीसी बॅंकेची निवडणूक तब्बल 11 वर्षांनंतर होणार; 4 आठवड्यांत निवडणूक घेण्याचे कोर्टाचे निर्देश

अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्रात राहण्याची बोलून दाखवलेली इच्छा आणि त्यानंतर अवघ्या काही तासांतच देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत रवाना झाल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यामुळे दिल्लीत काय घडामोडी घडतात आणि त्याचे महाराष्ट्रात काय परिणाम दिसणार, याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com