Devendra Fadanvis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis Speech: देवेंद्र फडणवीसांनी सुनावले, ‘होय मी नाशिक- दत्तक घेतले, मात्र विकास देखील केला’

Devendra Fadnavis on Nashik's Development: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना फटकारले, ते टिका करताततच, त्याला फारसे महत्त्व देऊ नये.

Sampat Devgire

Fadnavis Statement on Nashik's Progress: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतले होते. यावरून विरोधक सातत्याने मुख्यमंत्र्यांना टिकेचे लक्ष्य करीत आले आहेत. त्यावर फडणवीसांचे विरोधकांना चांगलेच फटकारले आहे. त्यामुळे विरोधाला फारसे महत्त्व न देण्याचे त्यांचे धोरण दिसते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिकच्या सीपीआरआय इलेक्ट्रिक प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय मंत्री जगदीश खट्टर, छगन भुजबळ आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यानिमित्ताने नाशिक लवकरच इलेक्ट्रिक वाहनांचे हब होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यादृष्टीने शासन विशेष प्रयत्न करणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेण्याची घोषणा केली होती. महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या प्रचार सभेत त्यांनी ती घोषणा केली होती. त्या माध्यमातून नाशिक शहरात मेट्रो सुरू करण्याचे आश्वासन देखील दिले होते. त्या दृष्टीने अपेक्षित कार्यवाही न झाल्याने टीका होत आहे.

यावर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलेच फटकारले आहे. नाशिक शहर मी दत्तक घेतले होते. या शहरावर माझे आजही तेवढेच प्रेम आहे. नाशिकच्या विकासासाठी सर्व दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

नाशिक शहर दत्तक घेतल्याची घोषणा केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले होते. तरीही आम्ही नाशिककडे दुर्लक्ष केलेले नाही. गेल्या कुंभमेळ्यात नाशिकला निधी दिला होता. आगामी कुंभमेळ्यासाठी ही पाच हजार कोटींची विकास कामे सुरू होणार आहेत. या शहरासाठी इको सिस्टीम तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

राज्य शासन विकासाच्या विविध प्रकल्पांवर अतिशय गांभीर्याने काम करीत आहे. विरोधी पक्ष सातत्याने राज्य सरकारवर टीका करीत असतो. ते त्यांचे कामच आहे. त्याकडे फारसे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता नाही, असे सांगत विरोधकांच्या टीकेला आपण फारसे महत्त्व देत नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात भारताची राजधानी कोणाकडे वाटचाल करीत आहे. पुणे, छत्रपती संभाजी नगर आणि नाशिक मध्ये या क्षेत्रातील उद्योगांमध्ये मोठी गुंतवणूक होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र लवकरच ईव्ही हब म्हणून विकसित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT