Rohit Pawar On Fadnavis  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohit Pawar On Fadnavis : फडणवीस 'एसी'त बसून बोलू नका, राजीनामा द्या; रोहित पवारांची मागणी !

कैलास शिंदे

Jalgaon News : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी दगडफेक केली, त्यानंतरच पोलिसांनी लाठीचार्ज केला, असा दावा फडणवीस करीत आहेत ते साफ चुकीची आहे. आम्ही प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. पहिली दगडफेक झाली हे साफ चूक आहे. अगोदर पोलिसांनी लाठीहल्ला केला महिलांनाही मारल, आपल्या आईवर जर लागत असेत मुलगा कसा गप्प बसेल, त्यानंतर दगडफेक झाली असेल, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी या लाठीहल्लयाची जबाबदारी घेवून गुहमंत्रीपदाचा राजीनामा देवून खुर्ची सोडावी असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जळगाव येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा दौरा जळगाव येथे मंगळवार (ता.५) जळगाव नियोजित आहेत. त्यानिमित्ताने आमदार रोहित पवार, आमदार सुनील भुसारा हे सुध्दा जळगाव दौऱ्यावर आहेत. आज जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना आमदार रोहित पवार म्हणाले, "जालना येथे पोलिसांनी मराठा आंदोलकावर केलेला लाठीहल्ला माणुसकीला काळीमा फासणारा आहे. पहिली दगडफेक झाली, त्यानंतर पोलिसांनी लाठीहल्ला केला हे साफ चुकीचे आहे, आपण प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आलो आहोत. तरावाली सराटी या गावाला भेट देवून आलो आहोत."

"मनोज जरांगे कुंटुबियांचीही भेट घेतली.ते संपूर्ण कुटुंब भयग्रस्त आहे, तसेच गावकऱ्यांचीही आपण भेट घेतली गावकऱ्यांनी सांगितले की, आंदोलन शातंतेत सुरू होते, मात्र पोलिसांनी पहिला लाठीहल्ला केला. महिला व लहान मुलांनाही बेदम मारहाण केली, यात महिलाही जखमी झाल्या आहेत. त्यामुळे फडणवीस केवळ वातानुकूलीत दालनात बसून वक्तव्य करू नये,त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी करावी व आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असेही पवार म्हणाले.

भाजपला आरक्षणाचे राजकारण करायचे आहे -

भारतीय जनता पक्षाला मराठा व धनगर आरक्षणाचा प्रश्‍न सोडवायचा नाही, त्यांना केवळ राजकारण करायचे आहे. असा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे. केंद्रात संसदेत चर्चेच्यावेळी एकही भाजपचे मराठा खासदार बोलला नाही. संभाजीराजे यांनाही राज्यसभेत बोलू दिले नाही. संजय राऊत यांनी विनंती केल्यानंतर संभाजीराजेना पाच मिनीटे बोलू दिले. त्यामुळे भाजपकडून एक प्रकारे दडपशाहीच केली जात आहे,असा आरोपही त्यांनी केला

६० टक्कयावर आणक्षण पुढे -

देशातील आरक्षणाची मर्यादा साठ टक्क्यांच्या पुढे गेली असल्याचे मत व्यक्त करून आमदार पवार म्हणाले,"त्यामुळ मराठा समाजाला आरक्षण ताबडतोब देण्यात यावे,असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT