Devendra-Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis Politics: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणासाठी कोणता मुहूर्त निवडणार?

Devendra Fadnavis; Simhastha Kumbh Mela Authority immediately, copies of Chief Minister Fadnavis' announcement-- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकला आले, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अमृत स्नानाच्या तारखा जाहीर करून गेले, मात्र प्राधिकरणाचा निर्णय अधांतरीच!

Sampat Devgire

Devendra fadnavis News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक जूनला नाशिक दौऱ्यावर येऊन गेले. त्यांचा हा दोन दिवसांचा दौरा होता. यामध्ये प्रामुख्याने सिंहस्थ कुंभमेळा हा विषय होता. तरीही त्याबाबत ठोस घोषणा केव्हा होणार? याची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे यंदाच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना मुहूर्त केव्हा लागणार याची उत्सुकता आहे.

नाशिकच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीबाबत साधू आणि आखाडा परिषद यांच्या अनेक तक्रारी आहेत. नाशिकच्या विविध शासकीय संस्थांना देखील याबाबत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे संस्था कुंभमेळ्याचा नेमका विकास आराखडा अद्याप ठरलेला नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात मुख्यमंत्री सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण जाहीर करती अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र याबाबत काहीही घोषणा झाली नाही. विविध विकास कामांच्या बाबतीत निविदा काढण्यास चालना देण्याचे मुख्यमंत्री सांगून गेले.

यंदाच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिका आणि अन्य संस्थांनी विकास कामांचा आराखडा सादर केला आहे. यामध्ये प्रामुख्याने गोदावरी प्रदूषण मुक्त करण्यावर भर देण्यात आला आहे. साधूंच्या आखाडे आणि स्थानिक नागरिकांनीही गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याला प्राधान्य देण्याची मागणी केली होती. त्यामुळे याबाबत दिलासादायक निर्णय होईल अशी अपेक्षा होती.

गेल्या कुंभमेळ्यात सध्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री होते. त्यांनी ३२७ एकर जमीन साधू ग्राम साठी आरक्षित करण्याची घोषणा केली होती. मात्र कुंभमेळ्याचा समारोप झाल्यावर त्या दृष्टीने काहीही प्रयत्न झाले. यंदाच्या कुंभमेळ्यात जमीन अधिग्रहित करण्याची आग्रही मागणी आखाडा परिषदेने केली आहे. विशेष म्हणजे किमान साडे सातशे एकर जमीन हवी अशी त्यांची मागणी आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या दौऱ्यात सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण घोषित करणे अपेक्षित होते. त्याबाबत कोणती घोषणा झालेली नाही. जिल्ह्याला पालकमंत्री मिळणार की नाही, हा विषय देखील अधांतरीच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस नाशिकला आले आणि गेले मात्र सिंहस्थ कुंभमेळ्या बाबत कोणताही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. त्याची घोषणा केव्हा होणार याची प्रतीक्षा कायम आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT