Girish Mahajan |Devendra Fadanvis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pahalgam Terror Attack: देवेंद्र फडणवीस सक्रीय, आज विमान २३२ पर्यटक घेऊन महाराष्ट्रात येणार!

Plane with 232 Tourists to Land in Maharashtra Today: काश्मीरमध्ये अडकलेले पाचशे पर्यटक गुरुवारी दोन विशेष विमानांसह महाराष्ट्रात परतले.

Sampat Devgire

Devendra Fadnavis News: पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. त्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटक ठार झाले. त्यानंतर निर्माण झालेली तणावाची स्थिती आता निवळली आहे. महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुरक्षित असून परतीच्या मार्गावर आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत व्यक्तिशः लक्ष घातले आहे. आज सकाळी त्यांनी ट्विट करून गुरुवारी 500 पर्यटक महाराष्ट्रात परतल्याचे सांगितले. गुरुवारी दोन विशेष विमाने या पर्यटकांना घेऊन आली. दोन्ही विमानात एकूण १८४ प्रवासी होते.

राज्य शासनाने मुंबईत विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. पक्षाकडून जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण आणि विविध लोकप्रतिनिधी श्रीनगरला मुक्काम ठोकून आहेत.

दहशतवादी हल्ला झाला तेव्हा महाराष्ट्रातील पर्यटकांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये सुमारे दीड हजार महाराष्ट्रातील पर्यटक काश्मीरमध्ये असल्याचे स्पष्ट झाले. सर्व पर्यटकांची शासनाच्या माध्यमातून संपर्क करण्यात आला आहे. गुरुवारी दोन विशेष विमाने श्रीनगरहून सोडण्यात आली. अन्य मार्गाने देखील पर्यटक परतीच्या मार्गावर आहेत.

गुरुवारी एकूण ५०० पर्यटक महाराष्ट्रात परतले. दोन विशेष विमानांतून १८४ प्रवासी परतले. आज तिसऱ्या विशेष विमानाने दुपारी २३२ प्रवासी महाराष्ट्रात परतेल. त्यातील प्रवाशांची यादी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज ट्विट केली आहे. राज्य शासन मदत कार्यात अग्रेसर असून विविध केंद्रीय संस्थांची मदत देखील घेतली जात आहे.

प्रत्येक जिल्हाधिकार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडून काश्मीरमध्ये किती पर्यटक आहेत याची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील ७६ पर्यटक सध्या काश्मीरमध्ये आहेत. यामध्ये पन्नास पर्यटक विविध पर्यटन संस्थांच्या माध्यमातून गेले होते. नागरिक स्वतंत्रपणे सहलीला गेले होते. हे सर्व सुरक्षित आहेत, असे नाशिकच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांनी सांगितले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात निर्माण झालेली परिस्थिती आता पूर्वपदावर येऊ लागली आहे. केंद्र शासनाच्या हस्तक्षेपाने तेथील वातावरण निवळले आहे. देशभरातील पर्यटन मिळेल त्या मार्गाने आणि व्यक्तिशः सोयी करून परतू लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT