Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Politics: अजित दादांनी नाड्या आवळल्या ; मंत्री अस्वस्थ, कामे ठप्प, कंत्राटदार रस्त्यावर...

Devendra Fadnavis;Don't put the state government's position in your pocket, call me sir-लाडकी बहीण सह विविध लोकप्रिय योजनांच्या मोहजाळात सापडलेल्या शासनाची अवस्था बिकट

Sampat Devgire

PWD Funds Politics; राज्याची प्रतिष्ठा आणि विकासाची मोजणी बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या कामांवरून होते. सध्या मात्र राज्यभर बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांनी आपली कामे बंद केली आहे. हे कंत्राटदार चक्क बांधकाम विभागाच्या कारावात ठिय्या देऊन बसले आहेत.

राज्यात लाडकी बहीण सह विविध लोकप्रिय योजना निवडणुकीच्या कालावधीत घोषित करण्यात आल्या. सध्या तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोमात आहेत. प्रत्येकाचा उल्लेख ते ‘लाडका’ असाच करतात. यामध्ये महाराष्ट्र राज्य मात्र ‘दोडका’ झाले, अशी स्थिती आहे.

याचा परिणाम म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांना गेल्या तीन वर्षांपासून निधी मिळालेला नाही. काम करूनही अनेक कंत्राटदारांची बिले प्रलंबित आहे. मेटाकुटीला आलेल्या या कंत्राटदारांनी आता थेट काम बंद आंदोलनच सुरू केले आहे. त्याचा दबाव अर्थमंत्री अजित पवार यांच्या विभागावरयेत आहे.

दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठेकेदारांनी धरणे धरले होते. महाराष्ट्रभर असे धरणे धरण्याचा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. नाशिकमध्ये याबाबत प्रशासनाविरुद्ध प्रचंड आरडाओरड झाली आहे. विशेष म्हणजे, हे सर्व कंत्राटदार राजकीय नेते, मंत्री आणि सत्ताधारी पक्षाच्या मर्जीतले असल्याने हे आंदोलन अधिक चर्चेचा विषय ठरले.

कंत्राटदारांनी कामे पूर्ण केल्यानंतर बिले सादर केली आहे. नाशिक विभागाला त्यातील अवघे तीन टक्के निधी बांधकाम विभागाला उपलब्ध झाला आहे. रस्ते आणि संबंधित कामांसाठी एक हजार ९०० कोटी रुपयांची बिले सादर करण्यात आली आहे. त्यासाठी अवघे ३४.६४ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. हे प्रमाण अवघे दोन टक्के होते.

याआधीही रस्ते, इमारती, पूल आणि अन्य पायाभूत सुविधांची कामे करण्यात आली होती. विशेष म्हणजे या कामांचे श्रेय घेण्यासाठी मंत्री, आमदार आणि राजकीय नेते सर्वात पुढे असतात. मात्र याच कामांची साडेतीन हजार कोटीहून अधिक रुपयांची बिले नाशिक विभागीय बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आली होती. शासकीय कंत्राटदारांना पैसे देण्यासाठी शासनाकडून निधीच उपलब्ध झाला नाही. त्यामुळे कंत्राटदारांनी काम बंद करून आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये विविध मंत्र्यांची देखील चांगलीच कोंडी झाली आहे.

अर्थ खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तर घोषणा करण्यात पुढे असणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याची सूत्रे हाकणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचीच प्रतिष्ठा यामध्ये पणाला लागली आहे. एकंदरच विकास कामांसाठी निधी नसल्याने तिजोरीत खडखड्यात असल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT