Dr. Anand Pawar: जिल्हा रुग्णालय वाद, तक्रार करणारा डॉक्टरच निघाला चक्क खंडणीखोर!

Dr Pratik bhangre;The complaining doctor turned out to be the extortionist in the district hospital dispute-जिल्हा शल्य चिकित्सकावर मारहाणीचा आरोप करणाऱ्या डॉ. आनंद पवार यांना अटक.
Dr Charudutt Shinde & Dr Anand Pawar
Dr Charudutt Shinde & Dr Anand PawarSarkarnama
Published on
Updated on

Dr. Anand Pawar News: जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली होती. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांमधील वाद चर्चेत आला होता. आता त्याला वेगळेच वळण मिळाले आहे.

नाशिकच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिंदे यांनी मारहाण केल्याची तक्रार डॉ. आनंद पवार यांनी केली होती. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. संबंधित जिल्हा चिकित्सक भाजपच्या एका मोठ्या राजकीय नेते आणि माजी केंद्रीय मंत्र्यांशी संबंधित असल्याने हा प्रकार चर्चेचा विषय होता.

Dr Charudutt Shinde & Dr Anand Pawar
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पुन्हा वादात, यावेळी नाशिक वादाचे केंद्र!

आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. तक्रार करणाऱ्या डॉ. आनंद पवार हे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडे दहा लाखाची खंडणी मागत होते. अशी तक्रार आहे. याबाबत पोलिसांनी डॉ. पवार यांना अटक केली आहे.

Dr Charudutt Shinde & Dr Anand Pawar
Neelam Gorhe Politics: नीलम गोऱ्हे यांना दिलेले पैसे कसे केले वसुल? नाशिकच्या नेत्याने वापरला 'हा' फंडा

जिल्हा रुग्णालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही. डी. पाटील आणि जिल्हा रुग्णालयातील माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पवार आदींवर खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी त्यांना सोमवारी ताब्यात घेतले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांमधील वाद नवा नाही. यामध्ये प्रशासनातील काही अधिकार्‍यांची फूस असल्याचे चर्चा आहे.

जिल्हा रुग्णालयात एक महिन्यापूर्वी एका आदिवासी महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. या मृत्यूला जिल्हा शल्य चिकित्सक हेच जबाबदार आहेत, असा आरोप डॉ. पवार यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी माहितीच्या अधिकाऱ्यात अर्ज करून रुग्ण तसेच अन्य उपचारांबाबत माहिती देखील मागितली होती. त्यावरून दोन दिवसांपूर्वी रुग्णालय कर्मचाऱ्यांची क्रीडा स्पर्धा सुरू होती. यावेळी डॉ. शिंदे यांनी बॅटने मारले, असा कांगावा डॉ. पवार यांनी केला होता.

आता या प्रकरणाला अचानक वेगळे वळण लागले आहे. संबंधित महिलेचा मृत्यू बाबत डॉक्टरांवर आरोप करण्यात आले होते. त्यासाठी दहा लाखांची खंडणी देखील मागण्यात आली होती. त्याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सरकार वाडा पोलिसांनी या तिन्ही डॉक्टरांना अटक केली आहे.

जिल्हा रुग्णालयात गेली काही दिवस राजकीय पार्श्वभूमी आणि वरिष्ठ नेत्यांची संबंध असलेले जिल्हा चिकित्सक यांच्या विरोधात वातावरण निर्मिती सुरू होती. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांमध्ये कामकाज आणि अन्य विषयांवर वाद होते. हा आवाज आता थेट खंडणीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com