Dr Ashok Dhavale
Dr Ashok Dhavale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस धिंगाणा थांबवा; अन्यथा घरावर मोर्चा काढू!

Sampat Devgire

नाशिक : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Ex C.M. Devendra Phadanvis) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात धिंगाणा सुरू आहे. हा बेजबाबदार (Irresponsiblity not right) पणा योग्य नाही. भाजप सरकारने (BJP Government in Centre) केंद्रात सत्तेत असल्याने उथळपणा सोडावा अन्यथा तुमच्या घरावर मोर्चे (Agitation at there home) काढू असा इशारा देण्यात आला.

अतिवृष्टी आणि गुलाब चक्रीवादळामुळे राज्यातील १८२ परिमंडळांमध्ये खरीप पिकांचे होत्याच नव्हतं झालं आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. राजकीय नेत्यांनी आता पंचनामे व दौऱ्यांचे फार्स न करता प्रतिहेक्टरी ५० हजार पहिला हप्ता देऊन तातडीने मदत करावी, अशी मागणी किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी केली.

अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. ढवळे, राज्याचे अध्यक्ष किसन गुजर, सरचिटणीस अजित नवले, माजी आमदार जे. पी. गावित, सहसचिव सुनील मालुसरे आदी उपस्थित होते. हप्ते भरून देखील लाखो शेतकऱ्यांना विम्याची भरपाई मिळालेली नाही. त्यात तातडीने लक्ष द्यावे अन्यथा अखिल भारतीय किसान सभा राज्यभर रस्त्यावर उतरेल असा इशारा देण्यात आला.

यावेळी ते म्हणाले, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी या मागणीसाठी पाठपुरावा केला जाईल. खरीप हंगामातील हाता तोंडाशी आलेले सोयाबीन, कापूस व इतर पिके नष्ट झाली आहे. केंद्र व राज्य सरकारने मिळून तातडीची प्राथमिक मदत म्हणून प्रति हेक्टर ५० हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत. त्यानंतर पीक व शेतजमीन नुकसानीचा योग्य अंदाज घेत शेतकऱ्यांचे उर्वरित संपूर्ण नुकसान भरून निघेल अशी ठोस मदत करावी.

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आत आपत्तीची सूचना देणे बंधनकारक आहे. मात्र राज्यभरात पीक विमा कंपन्या जिओ टॅगिंग फोटो पाठविण्याच्या सूचना करीत आहेत. मात्र शिवारात पाणी तुंबल्याने शेतात जाणे शक्य नाही. एकीकडे मोबाईल नेटवर्क नाही, संकेतस्थळांचे सर्व्हर डाऊन आहेत, त्यात ओटीपी येत नाहीत त्यामुळे ऑफ लाईन तक्रारी घेण्यात याव्यात.

ही आब घेण्याची वेळ नव्हे!

डॉ. ढवळे म्हणाले, केंद्रात भाजप सत्तेत आहे. त्या पक्षाच्या नेत्यांची देखील जबाबदारी आहे. मात्र त्यांचा केवळ गोंधळ सुरु आहे. राज्यात सत्तेवर बसलेल्यांचा मुख्यमंत्र्यांवर सर्व ढकलण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. परस्परांत संवाद नाही. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे जल्लोष करून मीठ चोळू नका तर तातडीने मदत द्या.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT