नको ती मागणी करणाऱ्या सेना नेत्याला महिलेचा चोप!

एका राजकीय पक्षाचा नेता व एका करिअर ॲकॅडमीचा संचालक असणाऱ्या नेत्याची महिलेचा मार खाताना चित्रफीत सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाला आहे.
leader Beaten by Women
leader Beaten by WomenSarkarnama

नाशिक : येथे एका राजकीय पक्षाचा नेता (Political leader beaten by Women) व एका करिअर ॲकॅडमीचा (Career acadamy director) संचालक असणाऱ्या नेत्याची महिलेचा मार खाताना चित्रफीत सोशल मीडियावर वाऱ्यासारखी (Viral on Socail Media) व्हायरल झाला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. हा नेता शिवसेनेशी (This leader belongs to Shivsena) संबंधीत असल्याचे बोलले जाते.

leader Beaten by Women
छगन भुजबळांवर ताणलेली बंदूक कोणाची? शिवसेनेची की राष्ट्रवादीची?

या नेत्याने एक करिअर ॲकॅडमी चालवण्यास घेतली आहे. या ॲकॅडमीमध्ये मुलींना करिअर कोर्सेसाठी प्रवेश दिला जातो. मात्र, मुलींच्या भोळेपणाचा फायदा घेऊन या नेत्याने मुलींना अश्लील बोलणे, मद्यसेवनासाठी बोलावणे, त्याचप्रमाणे पोलिस व्हायचे असेल तर माझ्याबरोबर मुक्कामी राहावे लागेल, अशा तक्रारी होत्या. अल्पवयीन मुलींना अश्लील बोलणे यामुळे या नेत्याला महिलेचा मार खावा लागला आहे. बेअब्रू होऊ नये म्हणून मुलींनी पोलिस दप्तरी तक्रार देणे टाळले.

leader Beaten by Women
सुहास कांदेंशी माझा वादच नाही, त्यांच्या अडचणी दूर करू!

या मुलींनी एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेकडे त्याची तक्रार केली होती. या महिलेचा मार खातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल होत असून, नाशिक रोडमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, हा राजकीय पक्षाचा पदाधिकारी लोकांच्या भांडणात मध्यस्थी करणे, विविध नियमांचा धाक दाखवून लोकांकडून पैसे उकळणे अशी कामे करीत असल्याची ही चर्चा सध्या नाशिक रोडमध्ये होत आहे. या नेत्याला महिलेने चांगला चोप दिला आहे. मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून ‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ अशीच चर्चा लोकांमध्ये होत आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com