Devidas Pingle News: नाशिक बाजार समितीच्या राजकारणाला धक्कादायक वळण लागले आहे. यासंदर्भात पायउतार झालेले सभापती देविदास पिंगळे यांनी गंभीर आरोप केला आहे. या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते देविदास पिंगळे नाशिक बाजार समितीच्या सभापती पदावरून पायउतार झाले आहेत. भाजपच्या शिवाजी चुंभळे यांनी त्यांच्या गटातील संचालकांना फोडले. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर श्रीमती कल्पना चुंभळे सभापती झाल्या आहेत.
या घडामोडींवर माजी खासदार पिंगळे यांनी गंभीर आरोप केला आहे. भाजपच्या शिवाजी चुंभळे यांच्या गटात जाण्यासाठी प्रत्येक संचालकाला ५० लाख रुपये देण्यात आले आहेत. याबाबतचे सर्व पुरावे आपल्याकडे आहेत. या संचालकांनी आर्थिक स्वार्थासाठी गद्दारी केली.
विद्यमान उपसभापती विनायक माळेकर यांनी २०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात यावे. विविध विकास कामांच्या नावाखाली हे कर्ज आपसात वाटून घ्यावे. आगामी निवडणूक या कर्जाचे पैसे आपसात वाटून घेऊ. त्यानंतर लढविण्याच्या भानगडीत पडू नये, असा सल्ला आपल्याला दिला होता. हा सल्ला आपण मान्य केला नाही. त्यामुळेच हे संचालक आपल्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये निवडून आले असतानाही विरोधी गटाला मिळाले.
गेली ३० ते ३२ वर्ष बाजार समितीचा कारभार अतिशय चांगल्या प्रकारे केला. बाजार समिती नावारूपाला आणली. सध्या जे पदाधिकारी सत्तेत आले आहेत, त्यांचा उद्देश केवळ भ्रष्टाचार आहे. त्यामुळे आगामी काळात बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. बाजार समिती डबघााईस जाण्याची शक्यता आहे, असा इशारा त्यांनी दिला.
आपल्या विरोधात गद्दारी केलेल्या संचालकांनी आर्थिक गैरव्यवहारांसाठी हे सर्व राजकारण घडविले आहे. त्यांना बाजार समितीच्या विकासाशी काहीही देणे घेणे नाही. या लोकांनी भ्रष्टाचारासाठी २०० कोटींचे कर्ज काढावे याबाबतचे रेकॉर्डिंग देखील आपल्याकडे आहे, असा दावा पिंगळे यांनी केला.
माजी सभापती पिंगळे यांनी शिवाजी चुंभळे तसेच अन्य संचालकांवर गंभीर आरोप केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत विद्यमान उपसभापती माळेकर आणि अन्य संचालक यावर काय खुलासा करणार याची उत्सुकता लागली आहे. मात्र २०० कोटी रुपयांच्या कर्जामुळे नाशिक बाजार समिती अचानक चर्चेत आली आहे.
-----
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.