
Nashik Political News: नाशिक बाजार समितीच्या सभापतीपदासाठी गेले महिनाभर जोरदार रस्सीखेच सुरू होती. यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही पडद्यामागून सूत्रे हलविली होती. अखेर नाशिकच्या बाजार समितीवर भाजप सत्तेत आला आहे. दुबईला गेलेल्या संचालकांनी भाजपची सत्ता आणण्यास हातभार लावला.
बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपमध्ये गेल्या महिन्यात प्रवेश केलेल्या कल्पना चुंबळे यांची यांची बिनविरोध निवड झाली. त्या पहिल्या महिला सभापती ठरल्या आहेत. आज सकाळी या निवडणुकीसाठी संचालक मंडळाची बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या विरोधात बाजार समितीच्या संचालकांनी नुकताच अविश्वास प्रस्ताव आणला होता.
देविदास पिंगळे यांच्या पॅनेलमध्ये निवडून आलेल्या नऊ संचालकांनी बंडखोरी केली होती. या संचालकांनी विरोधी पॅनेलला साथ दिली. त्यामुळे आज सत्तांतर झाले. या निवडणुकीसाठी विरोधी संचालक शिवाजी चुंबळे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. मंत्री गिरीश महाजन यांनीही मदत केली. त्यामुळे या सर्व राजकीय घडामोडी एकतर्फी झाल्या.
भाजपने महायुतीचा सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षालाच मोठा धक्का दिला आहे. नाशिक बाजार समितीतील सत्तांतर व्यक्तिगत द्वेषपूर्ण राजकारणातून घडल्याचा आरोप माजी सभापती देविदास पिंगळे यांनी केला होता.
विरोधी गटाला मिळालेल्या संचालकांना मोठे आर्थिक आम्हीच दाखविण्यात आले होते. याशिवाय राज्य सरकारचा काही निधी देखील विकासकामांसाठी देण्याचा प्रस्ताव असल्याने या संचालकांनी गद्दारी केल्याचा दावा पिंगळे यांनी केला होता.
नाशिक बाजार समितीच्या अविश्वास प्रस्ताव मंजुरीसाठी विरोधी गटात मिळालेल्या संचालकांचे फोन गेले दोन आठवडे बंद होते. यादरम्यान हे सर्व संचालक दुबईला गेले होते. त्यासाठी प्रचंड मोठा खर्च कोणी केला, हा देखील चर्चेचा विषय आहे.
एका बाजार समितीसाठी संचालकांना दुबईवारी घडविणाऱ्या नाशिक बाजार समितीच्या राजकीय घडामोडी त्यामुळे चर्चेचा विषय ठरला मतदानासाठी हे संचालक थेट दुबईहून दाखल झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.