Baban Gholap News, Nashik Latest Marathi News
Baban Gholap News, Nashik Latest Marathi News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: कडवट शिवसैनिकांचे देवळालीगाव बंडखोरांना शिकवेल चांगलाच धडा!

Sampat Devgire

नाशिक रोड : बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक (Shivsena) बंडखोरांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सदैव उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाठीशी उभे राहणार, मोडू पण वाकणार नाही, शिवसेनेची शिकवण मोडणार नाही असा निर्धार देवळाली (Nashik) मतदारसंघातील कडवट शिवसैनिकांनी केला आहे. (Shivsena workers will be with Uddhav Thakre allways)

जिल्ह्याच्या राजकारणात देवळाली मतदारसंघ हा शिवसेनेचा आत्मा समजला जातो. डझनभर नेते या मतदारसंघात राहतात. शिवसेनेचा नाशिकमधील जन्म १९ जून १९६८ रोजी ज्या देवळाली मतदारसंघातील देवळाली गाव भगूर आणि विहीतगाव येथे झाला, तेथील कडवट शिवसैनिकांनी भावना व्यक्त केल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये सुरवातीला शिवसेनेचे दोनच आमदार निवडून आले होते. यामध्ये बबन घोलप आणि अनिल राठोड यांचा समावेश होता. जिल्हाप्रमुख नाशिक रोडचे (स्व.) केशवराव थोरात यांची कारकीर्द गाजली होती. देवळाली मतदारसंघ तीस वर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघात अनेक कडवट शिवसैनिक घडले. येत्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने परिवर्तन झाले. एकेकाळी बालेकिल्ला असणारा देवळाली मतदारसंघातल्या शिवसैनिकांनी बंडखोरांना धडा शिकवणार, अशी शपथ घेतली आहे.(Nashik Latest Marathi News)

योगेश म्हस्के नॉट रिचेबल

बंडखोरी केलेले दादा भुसे, सुहास कांदे यांच्याबरोबर सामान्य शिवसैनिक देवळाली मतदारसंघातले योगेश म्हस्के आहेत. कोटमगावचे असणारे मस्के हे माजी मंत्री बबन घोलप यांचे सामान्य कार्यकर्ते होते. घोलप आणि त्यांना ग्रामीण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्षपद बहाल केले. 2019 ची विधानसभा निवडणूक शिवसेना पराभूत झाल्यावर ते एकनाथ शिंदे यांच्याजवळ गेले. एकनाथ शिंदे यांनी त्यांना उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देत वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख केले. पर्यायाने मस्के एकनाथ शिंदे यांचे कट्टर सैनिक झाले. शिंदे यांनी बंडखोरी केल्यावर नाशिक शहरात म्हस्के यांनी शिंदे यांच्या समर्थनाचा पहिला बॅनर लावला, त्याला शिवसैनिकांनी काळे फासले. ‘सकाळ’ ने योगेश म्हस्के प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, म्हस्के सध्या नॉट रिचेबल आहेत.

---

आम्ही शिवसेना संस्कृतीत वाढले लो असल्यामुळे आमच्या रक्तात बंडखोरी नाही शिवसेना हा संस्कार आणि विचार आहे. रस्त्यावर आलो तरी चालेल मात्र पक्षाशी व पक्षश्रेष्ठींशी गद्दारी करणार नाही. जे करतील त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. -

- किरण डहाळे, शिवसैनिक

...

योगेश म्हस्के यांची ओळख शिंदे यांची मीच करून दिली आहे. आम्ही बंडखोरी करण्याचा विषय येत नाही. शिवसेनेची पहिली शाखा 1968 ला मी सुरु केली आहे. देवळाली चे शिवसैनिक कट्टर आहेत ते कधीच बदलू शकत नाही.

- बबन घोलप, माजी मंत्री

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT