Nilesh Lanke-Dhananjay Munde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhananjay Munde Speech : पोलिसांचा बाप काढणारा उद्या तुमचा बाप..; मंत्री धनंजय मुंडेचा लंकेंना टोला

Nagar South Lok Sabha Constituency : देश 2014 मध्ये दिवाळखोरीत निघाला असताना नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची धुरा सांभाळत 10 वर्षांत इतके काम केले की, देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणून ठेवली आहे.

Pradeep Pendhare

Nagar, 09 May : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नगर दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार तथा एकेकाळचे जिवलग सहकारी नीलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली. जो पोलिसांचा बाप काढतो, उद्या निवडून आल्यावर तुमचा बाप काढायलासुद्धा कमी करणार नाही. पारनेर तालुक्याने जी चूक केली, ती चूक आता तुम्ही करू नका, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील (Nagar South Lok Sabha Constituency) महायुती भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या प्रचारार्थ शेवगावमध्ये कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांची सभा झाली. या सभेत मुंडे यांनी तडाखेबाज भाषण केले. आमदार मोनिका राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा, दत्ताभाऊ पानसरे, अरुण मुंडे आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, "उभा देश म्हणतोय की मोदींशिवाय पर्याय नाही. मोदी (Narendra Modi) देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आल्याचा आनंद होत आहे. खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर जिल्हा हा देशातील पहिल्या 10 प्रगत जिल्ह्यांत आल्याशिवाय राहणार नाही. 2014 मध्ये देश दिवाळखोरीत निघाला असताना नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची धुरा सांभाळत 10 वर्षांत इतके काम केले की, देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणून ठेवली.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगात देशाची इतकी पत आणि प्रतिष्ठा वाढली आहे की, आपल्या देशाबद्दल जर इतर देशातील मंत्रिमडळातील एखाद्या नेत्याने "ब्र" जरी काढला तरी त्या देशाचा पंतप्रधान त्या नेत्याचा राजीनामा घेतो. आज ही ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. यामुळे जर देश सुरक्षित आणि विकसित ठेवायचा असेल तर मोदींशिवाय देशाला कोणताही पर्याय नसल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.

विरोधकांचा समाचार घेताना धनंजय मुंडे यांनी 70 वर्षांत ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी केवळ लोकांची फसवणूक केली. पंतप्रधान मोदी यांनी 80 टक्के लोकांना मोफत रेशन देवून त्यांची भूक भागवल्याचे सांगितले. मुंडे यांनी माजी आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता जोरदार हल्ला चढवला. 'जो पोलिसांचा बाप काढतो, तो उद्या निवडून आल्यावर तुमचा बाप काढायलासुद्धा कमी करणार नाही. पारनेर तालुक्याने जी चूक केली, ती चूक आता तुम्ही करू नका', असे मंत्री मुंडे यांनी सांगितले.

नगर जिल्हा देशात विखेंमुळे नावारूपाला...

मंत्री मुंडे यांनी महायुती आणि मोदी सरकारच्या माध्यमातून शेतकरी, महिला, तरुणांना, औद्योगिक क्षेत्राला विविध माध्यमातून झालेल्या फायद्यांची माहिती दिली. खासदार सुजय विखे यांनी केलेल्या विकास कामांची माहिती दिली. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली खासदार विखेंच्या माध्यमातून नगर जिल्हा देशातील सर्वात विकसित 10 जिल्हा म्हणून नावारूपाला येईल, अशी खात्री दिली.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT