Chhagan Bhujbal ,Dharmendra Pradhan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : ...तर लाठीचार्ज, देशभर संताप हे टळलं असतं, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

Chhagan Bhujbal On Dharmendra Pradhan resignation : धर्मेंद्र प्रधान यांनी आता राजीनामा दिला आहे, परंतु तो त्यांनी 15 ते 20 दिवसांपूर्वीच द्यायला पाहिजे होता.तर हे सगळं घडलंच नसतं,असं म्हणत छगन भुजबळांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

Ganesh Sonawane

Chhagan Bhujbal : नीट पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला. शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान या घडामोडींवर राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

भुजबळ म्हणाले, जे घडलं ते सर्व तुमच्यासमोर घडलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी आधीच राजीनामा दिला असता तर या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या. त्यांनी उशीरा राजीनामा दिला, धर्मेंद्र प्रधान यांनी 15 दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असता तर आंदोलनाचा उद्रेक झालाच नसता असं त्यांनी म्हटलयं.

पोलिसांचा लाठीचार्ज, त्यानंतर देशात पसरलेली संतापाची लाट या सर्व गोष्टी संपूर्ण जगाने पाहिल्या आहेत. जर त्यांनी आधी राजीनामा दिला असता तर हे घडलं नसतं. हे आंदोलन दिल्लीतील जंतरमंतर पुरते नाही तर, नाशिकसह महाराष्ट्रासाठी आणि पूर्ण देशासाठी इशारा आहे.

सोनम वांगचूक यांना देखील तब्बल 26 दिवस उपोषण करावा लागलं. या काळात ज्या घटना घडल्या, त्या घटनांमुळे लोकांच्या मनात तीव्र संतापाची लाट पहायला मिळाली. आता हा संताप शांत करण्याचं काम झालं पाहिजे, सर्वांशी संवाद साधण गरजेचं असल्याचं भुजबळ म्हणाले.

कुंभमेळ्यावर भाष्य....

नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासासाठी तब्बल २८ हजार कोटी रुपयांच्या कामांचे नियोजन केले आहे. ही सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे आदेश आहेत. पुणे आणि मुंबईनंतर नाशिक हे पुढील महत्त्वाचे डेस्टिनेशन बनत असल्याने येथील रिंगरोड, सिमेंट रस्ते व ११६ कोटींच्या अन्य विकासकामांचा फायदा स्थानिक नागरिक आणि भाविकांना होईल असं भुजबळ म्हणाले.

अधिकारी व कंत्राटदारांनी कामांत दिरंगाई न करता जबाबदारीने काम करावे, कुंभमेळ्यासाठी जगभरातून येणारे भाविक गोदावरीचे पाणी घरी घेऊन जातात, त्यामुळे गंगेच्या पाण्यात प्रदूषण होणार नाही याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष दिले पाहिजे, असे भुजबळ यांनी सांगितले. या सर्व कामांबाबत मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट सूचना दिल्या असून, दिलेल्या सर्व मुद्द्यांची नोंद घेण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT