Chhagan Bhujbal: ५ मिनीटे आधी निवडणूक अधिकाऱ्याच्या छातीत कळ आणि अध्यक्षांची निवडणूक रद्द; कळ राजकीय की डावपेचाचा भाग?

Lasalgaon APMC Chhagan Bhujbal Chairman Election Cancelled chaist pain at Last Minute of Election Officer -सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाच मिनिटे आधी घडले तरी काय?
Chhagan Bhujbal file picture
Chhagan Bhujbal file pictureSarkarnama
Published on
Updated on

Lasalgaon Chairman News: आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ लासलगाव समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. मंत्री छगन भुजबळ समर्थक दोन्ही गटांतील ही निवडणूक ऐनवेळी टळली.

मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील लासलगाव बाजार समितीचे राजकारण सभापती निवडणुकीमुळे शनिवारी पुन्हा एकदा शीगेला पोहोचले. समितीत बाळासाहेब क्षीरसागर व पंढरीनाथ थोरे आणि जयदत्त होळकर व डी. के. जगताप असे दोन गट आहेत. दोन्ही गट मंत्री भुजबळ यांना मानणारे आहेत. 

शनिवारी सभापती आणि उपसभापतींची निवडणूक सकाळी अकराला होणार होती. त्यासाठी दोन्ही गट सज्ज होती. मात्र ऐनवेळी निवडणूक निर्णय अधिकारी कांतीलाल गायकवाड यांच्या छातीत कळ आली. त्यामुळे निवडणूक रद्द झाली. 

Chhagan Bhujbal file picture
Rajya Sabha Election : छगन भुजबळांच्या राज्यसभेच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम; 'त्या' अटीमुळे वाढली अडचण, 24 तासानंतरही निर्णय होईना !

समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी याबाबत माहिती दिली. मात्र असे काही घडल्यास ऐनवेळी अन्याय अधिकारी प्रक्रिया राबवतात. काल मात्र निवडणूकच रद्द झाली. त्याचे नेमके कारण राजकीय की सत्ताधारी जगताप आणि होळकर गटाची सोय असा प्रश्न आहे. 

Chhagan Bhujbal file picture
MLC Election : भाजपला धास्ती कोणाची? : सांगलीत ‘जयंत’नीतीची, तर साताऱ्यात ‘दुखावलेल्या मित्रां’ची; सदस्यांना पाठविले अज्ञातस्थळी

बाजार समितीतील सर्व अठरा सदस्य मंत्री भुजबळ यांचे नेतृत्व मांडणारे आहेत. त्यानुसार प्रत्येकात समान कालावधीसाठी श्री क्षीरसागर, डि. के. जगताप. जयदत्त होळकर आणि पंढरीनाथ थोरे असे अध्यक्षपदाचे रोटेशन ठरले होते. श्री क्षीरसागर आणि श्री जगताप यांचे रोटेशन पूर्ण झाले आहे.  

माजी सभापती क्षीरसागर यांच्या कारकीर्दीत सर्व संचालकांना बरोबर घेऊन काम झाले. मात्र डि. के. जगताप यांना ते जमले नाही. त्यामुळे संचालकांमध्ये दुफळी निर्माण झाली. कालच्या निवडणुकीत क्षीरसागर आणि थोरे गटाकडे दहा तर सत्ताधारी जगताप खोडकर गटाकडे आठ असे संख्याबळ होते. घरी गटाचे पारडे कमकुवत झाल्याने ऐनवेळी निवडणूक रद्द करण्याची खेळी झाल्याचे बोलले जाते.

या घडामोडींकडे मंत्री भुजबळ यांनीही सर्वच संचालक त्यांना मानणारे असल्याने राजकीय सोय म्हणून कानाडोळा केल्याचे बोलले जाते. आता नव्याने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे सत्ता पुन्हा क्षीरसागर- थोरे गटाकडे जाते की होळकर, जगताप गट जादूची छडी फिरवतो याची उत्सुकता आहे. 

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com