Shivsena laeders at Dharmveer movie Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

धर्मवीर चित्रपट प्रत्येक शिवसेनेचा प्रेरणास्त्रोत

माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणेंसह शेकडो कार्यकर्त्यांनी पाहिला ‘धर्मवीर’ चित्रपट.

Sampat Devgire

चोपडा : ठाण्याच्या (Thane) टेंभी येथील धगधगत्या अग्निकुंडाची धगधगती भगवी मशाल हाती घेऊन निघालेल्या शिवसैनिकाने (Shivsena) दीनदुबळे असो वा दलित पीडित, सर्वांनाच आपल्या आनंदाश्रमात बसवून न्याय देणाऱ्या न्यायदेवतेची कहाणी म्हणजेच ‘धर्मवीर’ चित्रपट असल्याचे भावोदगार माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे (Chandrakant Sonawane) यांनी काढले. (Dharmveer Anand dighe movie is motivation for Shivsena)

चोपडा येथे आशा टॉकीज सिनेमागृहात शिवसैनिकांनी मोफत दाखविलेल्या धर्मवीर चित्रपट प्रदर्शनानंतर जमलेल्या प्रचंड जनसमुदायपुढे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेत त्यांचे शिष्य आनंद दिघे यांचे गुरूप्रेम मन हेलावून टाकणारे आहे. हा चित्रपट प्रत्येक शिवसैनिकांनीच नव्हे तर हर एक धर्मवीराला प्रेरणास्रोत आहे, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी आमदार लता सोनवणे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, सागर ओतारी, शहरप्रमुख आबा देशमुख, महिला आघाडीच्या रोहिणी पाटील, महिला तालुकाप्रमुख मंगला पाटील, माजी उपसभापती एम. व्ही. पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील, नगरसेवक किशोर चौधरी, महेश पवार, महेंद्र धनगर, प्रकाश राजपूत, नगरसेविका संध्या महाजन, वासुदेव महाजन, सुनील बरडिया, पंकज जैन, गोपाल चौधरी, प्रवीण जैन, दीपक चौधरी, टॉकीजचे संचालक अनिल अग्रवाल, नरेश महाजन, ए. के. गंभीर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT