Dhule BJP News: धुळ्यात एक हाती सत्ता भाजपकडे होती. मात्र सत्ताधारी नगरसेवकांच्या कारभारावर विरोधी पक्ष आक्रमक होता. महापालिका निवडणुकीत हा प्रचाराचा कळीचा मुद्दा होता.
महापालिका निवडणुकीसाठी धुळे शहरात भाजप पक्षात जोरदार अंतर्गत राजकारण पेटले होते. त्याची परिणीती उमेदवारी निश्चित करताना झाली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत स्थानिक आमदारांवर जबाबदारी सोपवली होती.
भारतीय जनता पक्षाला धुळे महापालिकेत स्वबळावर सत्ता मिळाली होती. त्यातील समस्या आणि अकार्यक्षमता यावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आक्रमक होता. वर्षभर शिवसेना आणि माजी आमदार फारुक शहा विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष पेटला होता.
या सर्व घडामोडींमुळे महापालिका निवडणुकीत भाजपकडे इच्छुकांचा मोठा ओघ होता. त्यामुळे उमेदवारी देण्यासाठी आमदार अनुप अग्रवाल यांनी कठोर भूमिका घेतली होती. शेवटच्या दिवशी उमेदवारीचा निकाल घेताना भाजपने त्याची प्रचिती दिली.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. शेवटच्या तासापर्यंत भाजपमध्ये प्रचंड धमासान सुरू होती. यामध्ये एकेरीवर येऊन धक्काबुक्की करण्यापर्यंत परिस्थिती गेली होती. शेवटच्या क्षणी भाजपने धक्कादायक निर्णय घेतला. भाजपने ४५ नव्या इच्छुकांना संधी दिली. ३१ प्रस्थापित आणि माजी नगरसेवकांना घरी बसवण्याचा धाडसी निर्णय घेतला.
शेवटच्या क्षणी हा निर्णय झाल्याने उमेदवारी न मिळालेल्या दिग्गजांचीही चांगलीच कोंडी झाली. यातील सगळ्यांनीच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली होती. पक्षाचे कार्यकर्ते साथ देतील की नाही ही अनिश्चितता असल्याने मोजक्या इच्छुकांनाच बंडखोरी करता आली.
भाजपाच्या ३१ माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्याचा फटका उमेदवारी मिळालेल्या नव्या लोकांना बसणार आहे. काळात पक्षाचे नेते उमेदवारी नाकारलेल्या नेत्यांची मनधरणी करून त्यांना प्रचारात सहभागी करून घेणार आहेत. यामध्ये पक्षाला कितपत यश येते हा उत्सुकतेचा विषय आहे.
माजी नगरसेवक अण्णा भंडारी आणि त्यांच्या पत्नी श्रद्धा भंडारी यांनी उमेदवारी न मिळाल्याने संताप व्यक्त केला. या संतापातच त्यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली.
निवडणुकीच्या तोंडावर धुळे शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. पक्षांकडून फोडाफोडीचे राजकारण जोरात सुरू होते. या वादातूनच भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष आरती पवार यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. मीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. स्थायी समितीचे माजी सभापती दीपक खोपडे यांनाही शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. एकंदरच भाजपने धक्का तंत्र वापरत ३१ माजी नगरसेवकांना घरी बसवले, तो चर्चेचा विषय ठरला.
--------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.