

Ahilyanagar Municipal Election 2025 : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेना स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली असून, 66 उमेदवार दिले आहेत. भाजपने 32, तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने 34 उमेदवार दिले आहे. एकनाथ शिंदे शिवसेना 54 जागांवर निवडणुकीत लढणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष 32, तर काँग्रेस 14, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष 23, AIMIM सहा, आम आदमी पक्षाने सुरूवातीलाच दहा उमेदवारांची नावे जाहीर केली होती. अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर मुस्लिमबहुल भागात भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार मिळाला नाही.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडीनंतर चित्र स्पष्ट झालं. शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ मनगटावर बांधल. तसंच शिवसेनेचे अमोल येवले आणि विजय पठारे यांनी ऐनवेळी भाजपकडून मैदानात उतरले.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीकडून 11, तर भाजपने 14 विद्यमानांना पुन्हा संधी दिली. परंतु 12 माजी नगरसेवकांना नकार दिला. यात आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल जगताप, विनीत पाऊलबुधे, मीना चव्हाण यांनी निवडणुकीत माघार घेतली. नजरी शेख, रुपाली पारगे यांना उमेदवारी नाकारण्यात आली. राष्ट्रवादी सुनील त्र्यंबके यांच्या सुनेला भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. समद खान यांनी राष्ट्रवादी पूर्वीच सोडली आहे. भाजपकडून पल्लवी जाधव, रवींद्र बारस्कर, सोनली चितळे, राहुल कांबळे, गौरी नन्नावरे, लता शेळके यांना उमेदवारी नाकारण्यात आली.
एकनाथ शिंदे शिवसेना स्वबळावर लढत असून, 54 जागी लढत आहे. भाजपमधील नाराजांचा फायदा शिवसेनेने घेतला. विद्यमान 24 नगरसेवकांना किंवा त्यांच्या कुटुंबातील लोकांना उमेदवारी दिली आहे. तिकिट कापलेल्या भाजपमधील निष्ठावंतांनी शिवसेनेची वाट धरली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे दोघा बंडखोरांना शिवसेनेकडून स्थान देण्यात आले आहे.
भाजपने उमेदवारी नाकारलेले नितीन शेलार, संगीता खरमाळे, स्वप्नजा वाखुरे, नरेंद्र कुलकर्णी, निर्मला कैलास गिरवले यांना शिवसेनेकडून उमेदवार देण्यात आली. तसंच अजित पवार राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहराध्यक्ष अमित खामकर यांनीही शिवसेनेचे धनुष्य उचलले आहे.
नरेंद्र कुलकर्णी मुळचे भाजपचे आहेत. ते एकनाथ शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी करत आहे. त्यांना पोलिस संरक्षणात उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला. जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर संरक्षण देण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालो असताना, विरोधी मोठा जमाव आडकाठी करू लागला होता. त्यामुळे आपण पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधून संरक्षण मागितले. त्यानंतर अर्ज दाखल केला, असे नरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.