PM Narendra Modi & Dhule Corporation Building

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

मोदी साहेब, लस प्रमाणपत्रात गोंधळ करणाऱ्यांवर कारवाई करा!

महापा लिकेच्या बोगस लस प्रमाणपत्र घोटाळ्याची पंतप्रधानांकडे तक्रार

Sampat Devgire

धुळे : शिवसेनेच्या (Shivsena) महानगर शाखेने (Dhule Corporation) महापालिकेतील कोरोना प्रतिबंधात्मक लस प्रमाणपत्र घोटाळ्याची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे ई- मेलद्वारे केली आहे. देशद्रोही कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी शिवसेनेने केली आहे.

शिवसेनेने म्हटले आहे, की नागरिकांना मोफत लसीकरणाची महत्त्वाची योजना अविरत सुरू आहे. मात्र, येथील महापालिकेने शासकीय आदेशाची पायमल्ली करत लसीकरण न करता ४०० ते ५०० रुपयांची चिरीमिरी घेऊन लसीकरण झाल्याचे तब्बल आठ ते दहा हजार खोटे प्रमाणपत्र व लशीच्या बाटल्या विक्रीचा गैरउद्योग केला आहे.

या घोटाळ्याची व्याप्ती जवळपास दोन कोटी रुपयांपर्यंत आहे. मनपाच्या एसव्हीके नावाच्या लसीकरण केंद्रावरून एका दिवसात तब्बल दोन हजार ४०० प्रमाणपत्र विक्रीचा विक्रमही महाभागांनी केला आहे. लसीकरण केंद्र बंद असेल त्या दिवशीही प्रमाणपत्रे विकली आहेत. हा गैरउपक्रम आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे लेखी पत्र संबंधित कर्मचाऱ्यांनी आयुक्तांना दिले, अशी माहिती शिवसेनेला मिळाली आहे.

महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी वैयक्तिक लक्ष घालून दोषींना अद्दल घडवावी, अशी मागणी शिवसेनेचे महानगरप्रमुख मनोज मोरे यांनी तक्रारीतून केली आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT