Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde Politics: जिथे जिथे कोट्यावधींची रोकड, तिथे तिथे एकनाथ शिंदेंचे समर्थक, योगायोग की...

Dhule cash controversy; Wherever crores of rupees found, Eknath Shinde followers found there, coincidence or something else?-धुळे रोकड प्रकरणातून लोकसभा आणि विधानसभेतील पैशांचे प्रकरण पुन्हा आले चर्चेत.

Sampat Devgire

Eknath Shinde News: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात कोट्यावधी रुपये ही किरकोळ बाब वाटावी अशी स्थिती झाली आहे. गेल्या सरकार बाबत 'खोके' हा शब्द चर्चेत आला होता. त्यामुळे धुळे रोकड गैरव्यवहार प्रकरणाबाबत देखील उलट सुलट चर्चा सुरू आहे.

विधिमंडळ अंदाज समितीचा दौरा धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात झाला. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार अर्जुन खोतकर हे या समितीचे प्रमुख होते. त्यांच्या या दौऱ्यात त्यांचे स्वीय सहाय्यक आणि मंत्रालयातील एक अधिकारी किशोर पाटील यांच्या खोलीत १.८४ कोटी रुपयांची रोकड सापडली, असा आरोप आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी हे प्रकरण खोदून काढले. त्यांनी धुळे विश्रामगृहावर अक्षरशः स्टिंग ऑपरेशन केले. अतिशय चिकाटीने त्याचा पाठपुरावा करण्यासाठी ते विश्रामगृहावर तळ ठोकून बसले. त्यामुळे प्रारंभी अजिबाबत दाद न देणारी प्रशासकीय यंत्रणा शेवटी नरमली.

यानिमित्ताने शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि त्याची कार्यपद्धती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लोकसभा निवडणुकीत नाशिकला दौऱ्यावर येताना मुख्यमंत्री शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये १९ बॅगा होत्या. त्यात १५ कोटी रुपये होते, असा आरोप शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला होता.

या आरोपातून लक्ष विचलित करण्यासाठी पुढच्या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हेलीकॉप्टरमधील बॅगांची तपासणी करण्याचे नाट्य घडले. अर्थातच त्यात काहीच आढळले नाही. याबाबत मोठ्या प्रमाणावर ऐन निवडणुकीत आरोप प्रत्यारोप झाले होते. त्यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे हे शिंदे पक्षाचे उमेदवार होते.

त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत देवळाली मतदारसंघात राजश्री अहिरराव या ऐनवेळीच्या मात्र शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवार होत्या. त्यांना नाशिकच्या हॉटेल रेडिसन येथील कक्ष क्रमांक ७०६ मध्ये अन्य नेत्यांसह आढळल्या. या खोलीतून १.९८ कोटी रुपयांची रोकड ताब्यात घेण्यात आली. यावेळी देखील थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यामुळे भरारी पथकाने ही कारवाई केली होती.

या कारवाईदरम्यान मंत्रालयातील एक अधिकारी आणि उमेदवार श्रीमती अहिरराव यांच्या भगिनी घटनास्थळी आढळून आल्या. शिंदे यांचे निकटवर्तीय ठाणे येथील जयंत साठे या सामान्य कार्यकर्त्याकडे हे पैसे होते. प्राप्तिकर विभागाने ते ताब्यात घेतले. पुढे काय झाले? हे सर्व गुलदस्त्यातच आहे.

विशेष म्हणजे धुळे रोकड प्रकरणात किशोर पाटील या मंत्रालयातील कर्मचाऱ्याला तातडीने निलंबित करण्यात आले. मात्र विधानसभा निवडणुकीत रोख रकमेसह आढळलेल्या पाटबंधारे विभागाच्या मंत्रालयातील अधिकारी श्रीमती अहिरराव यांच्यावर कारवाई का झाली नाही? हे अनुत्तरीत आहे.

योगायोग म्हणजे उघडकीस आलेल्या धुळे, नाशिक लोकसभा, देवळाली विधानसभा या निवडणुकीत जिथे जिथे कोट्यावधी रुपये सापडले, त्याचा संबंध शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या कुठल्यातरी नेत्याशी जोडला गेला आहे. हे प्रकरण उघडकीस आणण्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते सक्रीय होते. हा योगायोग म्हणावा की अन्य काही याची झणझणीत चर्चा धुळे रोकड प्रकरणातून पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT