Dhule Former Mayor Kalpana Mahale Quits Sharad Pawar’s NCP : राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी मुंबई, ठाणे, पुण्यासह २९ महापालिकेची निवडणूक जाहीर केली. या घोषणेनंतर लगेचच धुळ्यात राजकीय घडामोडी घडल्या. सर्व पक्षातील नेते सक्रिय झाले आहेत. धुळ्यात भाजपने डाव टाकत माजी महापौर कल्पना महाले यांना आपल्या पक्षात ओढले आहे. कल्पना महाले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश झाला.
कल्पना महाले यांच्या सोबत शिवसेनेचे माजी नगरसेवक गुलाब माळी आणि कैलास मराठे यांनीही भाजपात यावेळी प्रवेश केला. अनेक कार्यकर्त्यांसह हा प्रवेश झाल्यामुळे धुळ्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर कल्पना महाले यांचा पक्षप्रवेश झाल्याने धुळ्यात भाजपची ताकद वाढली आहे.
पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत कल्पना महाले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नुकत्याच झालेल्या दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद निवडणुकीत धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आपली राजकीय ताकद दाखवत दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेवर एकहाती सत्ता मिळवली आहे. नगराध्यक्षांसह सर्व सदस्य बिनविरोध निवडणूक आले आहेत.
आता महापालिकेच्या निवडणुका जाहीर होताच जयकुमार रावल कामाला लागले असून अन्य पक्षातील नेते आपल्या पक्षात कसे येतील, याकडे ते लक्ष ठेवून आहेत. नगरपरिषद निवडणुकीत त्यांनी राबवलेली प्रचार यंत्रणा महापालिकेच्या निवडणुकीतही उत्तम राबवून कुठल्याही परिस्थितीत धुळे महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकावयाचा असा चंग त्यांनी बांधला आहे. त्यासाठी रणनीती आखली असून पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
नगरपरिषदेप्रमाणे महापालिका निवडणुकीतही भाजप नंबर एकचा पक्ष ठरेल, असा विश्वास जयकुमार रावल यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील अन्य महापालिका निवडणुकीमध्ये देखील शतप्रतिशत भाजपा असाच निकाल महाराष्ट्राचा लागणार, असेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.