Chandrakant Khaire News: नेत्याच्या घरात उमेदवारी कुणाला? मुलगा अन् पुतण्यासाठी माजी खासदाराची उद्धव ठाकरेंना साद

Chandrakant Khaire Demand Rishikesh Khaire Candidature: छत्रपती संभाजीनगरच्या ज्या गुलमंडी वरून स्वतः चंद्रकांत खैरे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली त्याच प्रभागात जयस्वाल तनवाणी आणि आता खैरे यांच्या पुतण्यासाठी उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झाली आहे.
Chandrakant Khaire son candidature
Chandrakant Khaire son candidatureSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT news : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आमदार प्रदीप जयस्वाल आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यात मुलगा आणि भावाच्या एकाच प्रभागातील उमेदवारीवरून सध्या वाद सुरू आहेत. असाच वाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातही सुरू झाला आहे. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आपला मुलगा माजी नगरसेवक ऋषिकेश खैरे आणि पुतण्या सचिन खैरे यांच्या उमेदवारीसाठी पक्षाकडे मागणी केली आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या ज्या गुलमंडी वरून स्वतः चंद्रकांत खैरे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली त्याच प्रभागात जयस्वाल तनवाणी आणि आता खैरे यांच्या पुतण्यासाठी उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झाली आहे.

खैरे यांनी ऋषिकेश आणि सचिन या दोघांपैकी एकाला गुलमंडी प्रभागातून उमेदवारी मिळावी अशी मागणी पक्षाकडे केली आहे. मात्र त्यांनी आपापल्या आधीच्या प्रभागांमधूनच निवडणूक लढवावी, गुलमंडीवर दुसऱ्या कुणाला संधी दिली जावी असा सल्ला त्यांना देण्यात आल्याची माहिती आहे.

त्यामुळे शिंदे सेनेपाठोपाठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातही नेत्यांच्या घरातील तिकिटावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे मुलगा ऋषीकेश खैरेंना क्रांती चौक (प्रभाग १९) तर पुतण्या सचिन खैरेंना गुलमंडीवरून (प्रभाग १५) तिकीट मिळावे म्हणून आग्रही आहेत. दोघांनी त्यांच्या जुन्या भागातून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरत त्यांच्या उमेदवारीला सोमवारी (ता. १५) झालेल्या पक्षाच्या बैठकीत विरोध करण्यात आला.

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीची सोमवारी औरंगपुऱ्यातील शिवालय येथे बैठक घेण्यात आली. त्यात उमेदवारीवरून पुन्हा एकदा गटबाजी समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Chandrakant Khaire son candidature
Ajit Pawar: फडणवीस मैत्रीपूर्ण लढत म्हणताच अजितदादांची दोस्तीत कुस्ती; भाजप-शिवसेनेला दिला धक्का

गुलमंडी भागातील प्रभागातून शिंदेसेनेत देखील वाद निर्माण झाला आहे. आमदार प्रदीप जैस्वाल व माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. जैस्वाल मुलगा ऋषीकेषसाठी आग्रही आहेत तर तनवाणी मुलगा बंटी व भाऊ राजू तनवाणी यांच्यासाठी दावा केला आहे.

सोमवारच्या बैठकीत नेते चंद्रकांत खैरे यांनी ऋषीकेश यांच्यासाठी क्रांती चौक तर पुतण्या सचिन खैरेंना गुलमंडीवरून तिकीट मिळावे म्हणून आग्रह केला. त्यावर दुसरे नेते अंबादास दानवे यांनी या दोघांनी मुळ भागातून निवडणूक लढवावी, अशी सूचना केली.

जुन्या भागात त्यांनी केलेली कामे प्रभागातील इतर उमेदवरांना निवडून आणण्यासाठी उपयोगी पडतील, असे दानवे यांचे म्हणणे होते. ऋषीकेश यांनी यापूर्वी समर्थनगर वॉर्डातून तर सचिन यांनी बेगमपूरा वॉर्डातून निवडणूक लढविली होती. त्या-त्या भागातील स्थानिकांनाच प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना दानवे यांनी यावेळी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com