Vote theft allegations Maharashtra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या व्होट चोरीच्या मुद्यावर सत्ताधारी भाजपची चांगलीच डोकेदुखी वाढलेली आहे. व्होट चोरीचा मुद्द्यामुळे देश पातळीवर सत्ताधारी भाजपविरोधात राजकारण ढवळून निघालं आहे. बिहारच्या निवडणुकीत हा मुद्दा चांगलाच तापला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील व्होट चोरीचा मुद्दा देखील चर्चेत आहे. राहुल गांधी यांच्या व्होट चोरीच्या या मुद्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे धुळ्यातील माजी आमदार अनिल गोटे यांनी गंभीर मुद्दे उपस्थित करत खळबळ उडवून दिली आहे.
धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी विधानसभा निवडणुकीत 45 हजार बोगस मतदान (Voter) झाल्याचा खळबळजनक दावा केला आहे. राहुल गांधी यांनी व्होट चोरीत एकाच घरात 80 कुटुंबीय राहत असल्याचा खुलासा केला होता. परंतु धुळ्यात 195 कुटुंबीय एकाच घरात राहतात, एवढ नव्हेत तर, 167 आणि 66 जणांचे कुटुंब एकाच घरात मतदारांची नोंद दाखवण्यात आली आहे, असा दावा अनिल गोटे यांनी केला.
अनिल गोटे यांनी मतदारांच्या अशा नोंदीवरून निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या खुलासा पेक्षा, धुळ्यात झालेला खुलासा मोठा आहे. एकाच नावाचे खूप सारे मतदारांची नाव मतदार यादीत आहेत, असा दावा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला.
मतदार यंत्रणेमध्ये घोळ करण्यासाठी जोशी नामक इसमास दोन कोटी रुपयांचा पहिला हप्ता वाशी इथं देण्यात आल्याचा गौप्यस्फोट देखील अनिल गोटे यांनी केला. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. पण साधी चौकशी देखील केली नाही. निवडणूक आयोगाला आरोपी करायचे असेल, तर या दोघांना देखील आरोपी करणे आवश्यक आहे, अशी मागणी अनिल गोटे यांनी केली.
विधानसभेचे मतदार होते 3 लाख 46 हजार, मतदान झालं 3 लाख 64 हजार, त्यात तीन महिन्यात 18 हजार मते अधिकृत वाढली. अनधिकृतपणे 27 हजार मते वेगळी वाढली. मतदार याद्यांमध्ये एकच नाव दोन वेळा, काय तमाशा लावला आहे का? वाढ झालेल्या मतदारांची तपासणी करता, पत्त्यावर चौकशी करा, म्हणजे सर्व काही समोर येईल, असेही अनिल गोटे यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.