Tehsildar bribe case : तहसीलदारानं लाचेची रक्कम टॉयलेटमध्ये 'फ्लश' केली; तरीही पथकाकडून 'रिकव्हरी'

Buldhana Motala Tehsildar Hemant Patil Caught Taking Two Lakh Bribe ACB Akola Action : शेतकऱ्याकडून दोन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी तहसीलदार हेमंत पाटील याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अकोला पथकाने कारवाई केली.
Tehsildar Hemant Patil
Tehsildar Hemant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Buldhana corruption case : शेतकऱ्याची वर्ग दोनची जमीन वर्ग एकमध्ये करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागणे तहसीलदाराला चांगलेच भोवलं आहे. बुलढाणा इथल्या मोताळा कार्यालयाचे तहसीलदार हेमंत भागवत पाटील (वय 44) याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अकोला पथकाने दोन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

लाचेची रक्कम टाॅयलेटमध्ये टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार तहसीलदार पाटलाने केला. परंतु पथकाने ही लाचेची रक्कम रिकव्हर केली. बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात या लाचप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

तक्रारदार याची वर्ग दोनची जमीन वर्ग एकमध्ये करायची होती. यासाठी तक्रारदार शेतकरी (Farmer) सुरूवातीला तहसीलदार हेमंत पाटील याला भेटले. तहसीलदार पाटील याने तक्रारदार शेतकऱ्याकडे प्रति एकर 50 हजार रुपयांची, एकूण चार एकरचे दोन लाख रुपयांची लाचेची मागणी केली.

तक्रारदार शेतकऱ्याने यावर लाचलुचपत प्रतिबंध (Anti corruption bureau) विभागाच्या अकोला पथकाकडे तीन सप्टेंबरला तक्रार केली. पथकाने प्राप्त तक्रारीवरून 13 सप्टेंबरला पडताळणी केली. यात पडताळणीत तहसीलदार हेमंत पाटील याने लाचेची मागणी केल्याचे समोर आले. यानंतर काल 14 सप्टेंबरला तहसीलदार हेमंत पाटील याने त्याच्या बुलढाणा इथल्या राहत्या घरी रामलक्ष्मी नगर इथं लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी केली.

Tehsildar Hemant Patil
Political Dynasty in India: दर पाचपैकी एक लोकप्रतिनिधी 'घराणेशाही'तून; उत्तर प्रदेश अन् महाराष्ट्राचं स्थान कितवं?

तहसीलदार हेमंत पाटील लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी करत असतानाच, पथकाने त्याच्या घराभोवती सापळा रचला होता. तक्रारदार शेतकऱ्याकडून तहसीलदार पाटील याने दोन लाख रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले. तहसीलदार पाटील याला कारवाईचे संशय आल्याने लाचेची रक्कम घरातील शौचालयामध्ये टाकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु पथकाने शिताफीने रक्कम रिकव्हर केली.

Tehsildar Hemant Patil
Pune Zilla Parishad election : पुण्यात खुलं मैदान; अध्यक्षपदाची स्वप्न रंगली, राजकीय 'फिल्डिंग' लागली : कोण बाजी मारणार?

लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अमरावती परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अतिरीक्त पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे, उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अतुल इंगोले, पोलिस कर्मचारी दिंगाबर जाधव, अविनाश पाचपोर, गोपाल किरडे, संदीप ताले, असलम शहा, नीलेश शेगोकार, अर्चना घोडेस्वार, चालक नफिस यांनी ही कारवाई केली. तहसीलदार हेमंत पाटील याच्याविरोधात बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com