Dhule Lok Sabha Election Voting news Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Election 202Results Live: भामरे, बच्छाव यांची धाकधुक वाढली; फेर मतमोजणी सुरु

सरकारनामा ब्यूरो

Congress Vs BJP politics: धुळे लोकसभा मतदारसंघात मतमोजणी सुरुवातीपासून अतिशय चुरस दिसून आली. भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांनी शेवटच्या फेरीत चौदाशे मतांची आघाडी घेतल्याचे कळते.

मतदारसंघात डॉ. भामरे आणि काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्या अत्यंत चुरस आहे. यामध्ये प्रारंभी डॉ. शोभा बच्छाव यांनी आघाडी घेतली होती. डॉ. भामरे यांनी सहा हजार मतांची आघाडी घेतली. काही काही वेळ डॉ. भामरे यांना २३ हजारांची आघाडी होती. आघाडीचा हा पाठ शिवणीचा खेळ सतत सुरू होता.

सोळाव्या फेरी अखेर काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांना पाच लाख 48 हजार 303 मते होती. भाजपचे डॉ. भामरे यांना पाच लाख पंचेचाळीस हजार 986 मध्ये असल्याने काँग्रेसच्या बच्छाव 2317 मतांनी आघाडीवर होत्या. त्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये धाकधुक होती. त्यावरून तणावही निर्माण झाला होता.

पुढच्या दोन फेऱ्यांमध्ये डॉ. भामरे हे चौदाशे मतांनी आघाडीवर होते. त्यामुळे ते विजयी होतील अशी स्थिती होती. या माहितीने तणाव निर्माण झाला यावेळी काँग्रेसच्या डॉ. बच्छाव यांनी मतमोजणीचा अर्ज दिला. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तेराव्या फेरीपासून मतमोजणीला प्रारंभ केला आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी भेट घेतली. मतमोजणी केंद्र बाहेर प्रचंड घोषणाबाजी आणि तणाव निर्माण झाला होता. फेर मतमोजणी सुरू असल्याने अद्यापही येथे तणावाची स्थिती आहे कोणता उमेदवार विजयी होतो. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT