Jalgaon Lok Sabha 2024 winner: स्मिताताईंकडून ठाकरेंचा वाघ 'घायाळ'; उदयबापूंची आठवण..

Smita Wagh Jalgaon Lok Sabha Elections 2024 winner: गेल्या सन २०१९ लोकसभा निवडणूकीत त्यांना भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली होती. अर्ज भरून त्यांनी प्रचार केला होता.
Jalgaon Lok Sabha 2024 winner
Jalgaon Lok Sabha 2024 winnerSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Lok Sabha 2024 Elections News: भारतीय जनता पक्षाने गेल्यावेळी लोकसभेची उमेदवारी देवूनही ऐनवेळी रद्द केली,पक्षाचे जिल्हाध्यक्ष पती उदय वाघ यांचे अचानक निधन झाले. त्यानंतर पक्षनिष्ठा कायम ठेवून यावेळी उमेदवारी मिळवून मोठे यश मिळविले व पती उदय वाघ याना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली.जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने विजयाचा गुलाल उधळला आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्मिता वाघ (Smita Wagh) या १ लाख ९२ हजार ३१२ मतांनी आघाडीवर आहेत.त्यांचा विजय जवळजवळ निश्चित झाला आहे. त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांच्यावर हा विजय मिळविला आहे.

स्मिता वाघ या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या आहेत. त्यानंतर त्या जिल्हा परिषद सदस्य तसेच अध्यक्ष झाल्या. पक्षाने त्यांना विधानपरिषदेत आमदार केले. त्यांचे पती उदय वाघ हे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. गेल्या सन २०१९ लोकसभा निवडणूकीत त्यांना भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली होती. अर्ज भरून त्यांनी प्रचार केला होता. मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करून उन्मेष पाटील याना उमेदवारी देण्यात आली ते विजयी झाले.

नाराज न होता स्मिता वाघ यांनी पक्षाचे काम सुरूच ठेवले. परंतु याच काळात पतीचे निधन झाले.तरीही खचून न जाता त्यांनी राजकीय कार्य जनसंपर्क सुरूच ठेवला. या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या कार्याचा बळावर पक्षाची उमेदवारी मिळविली त्यानंतर त्यांना जिल्ह्यात मंत्री गिरीश महाजन,आमदार मंगेश चव्हाण, पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार सुरेश भोळे, मंत्री अनिल पाटील, शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील यांची साथ मिळाली आणि त्या आज विजयी झाल्या आहेत.

Jalgaon Lok Sabha 2024 winner
Nandurbar Lok Sabha Constituency 2024: वडिलांच्या पराभवाचा वचपा काढला; नंदुरबारमध्ये काँग्रेसनं मैदान मारलं

आपल्या पत्नीला खासदार करण्याचे पतीचे स्वप्न पूर्ण करून त्यांनी आपल्या पतीना श्रद्धांजली अर्पण केली आहे.यात जनतेने त्यांना भरभरून साथ दिली आहे. भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी तब्बल दीड लाख पेक्षा जास्त मतांनी विजय मिळविला आहे. यामुळे जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

यंदा जळगाव लोकसभा मतदारसंघात माजी आमदार स्मिताताई वाघ यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर त्यांच्याविरुद्ध नुकतेच ठाकरे गटात प्रवेश केलेले पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण बाळासाहेब पवार रिंगणात होते. करण पवार यांना जळगावचे तिकिट मिळाल्यानंतर प्रचाराचा एकच धडाका उडवून दिल्यामुळे आधी भाजपसाठी सोपी वाटणारी निवडणूक ही अंतिम फेरीपर्यंत मोठ्या चुरशीची बनली. करण बाळासाहेब पवार यांना दोन लाख अडोतीस हजार आठशे सत्याऐंशी इतके मते मिळाली आहेत.

स्मिता वाघ : 7,04,197.

करण पवार : 4,46,339.

स्मिता वाघ : 2,57, 858 मतांनी विजयी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com