BJP workers EVM damage Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP workers EVM damage : मतदान केंद्रात घुसखोरी, EVM मशीन फोडली; धुळ्यात निवडणुकीला गालबोट, शिंदेसेना-भाजप आमनेसामने

Dhule Election Ruckus: BJP Workers Broke EVMs, Alleges Eknath Shinde Sena : धुळे महापालिका निवडणुकीत मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन फोडण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.

Pradeep Pendhare

Dhule Municipal Election : धुळे महापालिका निवडणुकीत राडा झाला आहे. मतदान केंद्रात घुसून, ईव्हीएम मशीन फोडण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा प्रताप केल्याचा गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केला. या प्रकारामुळे मतदान प्रक्रिया काही काळ ठप्प पडली होती.

पोलिसांनी अतिरीक्त बंदोबस्त वाढवला होता. त्यामुळे छावणीचे स्वरूप आलं होतं. मतदानाच्या आदल्या दिवसापासून धुळे शहरातील वातावरण तापलं असून, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडे होत आहेत. यातच ईव्हीएम मशीन फोडण्यात आल्याची भर पडली. त्यामुळे मतदानावेळी तणावाचे वातावरण होते.

धुळे महापालिका निवडणुकीत (Municipal Election), तणावपूर्ण वातावरणात मतदान सुरू आहे. यातच प्रभाग क्रमांक 18 मध्ये ईव्हीएम मशीनची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही ईव्हीएम मशीनची तोडफोड केल्याचा आरोप एकनाथ शिंदे शिवसेना कार्यकर्त्यांनी केला आहे

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित यांनी मतदान केंद्रावर धाव घेतली. पोलिसांनी त्यांनी जाब विचारला. बंदोबस्त असताना, ते इथं आले कसे? ईव्हीएम मशीन फोडेपर्यंत बंदोबस्तावरील पोलिस काय करत होते, अशा प्रश्नांच्या सरबती त्यांनी केल्या. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत, नोंद घेतली आहे.

'मतदानाच्या काही दिवसांपासून शहरातील वातावरण दूषित केले जात आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना टार्गेट केले जात आहे. मतदानाच्या दिवशी हा प्रकार म्हणजे, दादागिरी अन् दहशत माजवण्याचा आहे,' असा आरोप आमदार मंजुळा गावित यांनी केला.

मतदान केंद्रावरील या प्रकारामुळे जवळपास अर्धा ते पाऊणतास मतदान प्रक्रिया थांबली होती. त्यामुळे या मतदान केंद्रावर मतदानाची वेळ वाढवून मिळावी, अशी मागणी आमदार मंजुळा गावित यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली. या गोंधळानंतर पोलिसांनी मतदान केंद्रावर बंदोबस्त वाढवला आहे. एकप्रकारे छावणीचं रूप धुळे महापालिका निवडणुकीत आलं आहे.

धुळे महापालिकेत एकूण 74 जागांसाठी निवडणूक घेतली जाते. मतदानाची वेळ वाढीसंदर्भात निवडणूक आयोगाकडून कोणत्या सूचना येतात, यानुसार कार्यवाही होईल, असे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT