Jayant Patil sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jayant Patil: मराठा आरक्षणाला न्यायालयात आव्हान देणारे कोण होते? जयंत पाटलांचा भाजपला थेट सवाल

Sampat Devgire

Dhule news: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण कळीचा (Maratha reservation) मुद्दा आहे. या विषयावर दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह विरोधकांना भाजपने धारेवर धरले होते.

ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नाना पटोले यांना भाजपने प्रश्न केला होता. मराठा आरक्षण या विषयावर भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले होते. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उत्तर दिले आहे.

जयंत पाटील सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांनी धुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची संवाद केला. शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.जयंत पाटील यांनी भाजपच्या वर्मावरच बोट ठेवले. भारतीय जनता पक्षाने आणि त्यांचा सहकारी पक्षाने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर यापूर्वी काय भूमिका घेतली होती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार होते. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. चव्हाण यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यावेळी हे आरक्षण प्रत्यक्षात येऊ नये, म्हणून कोणी, कोणी काय भूमिका घेतली होती. न्यायालयात कोणी आव्हान दिले होते. आव्हान देणारे कोण होते, असा थेट सवाल जयंत पाटील यांनी भाजपला केला आहे.

जयंत पाटील यांच्या या प्रश्नाने भाजप संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मराठा आरक्षणाला न्यायालयात विरोध करणारे याचिका करते आणि भाजप नेते यांच्याबाबत नेहमीच चर्चा होत आली आहे. त्याला पुन्हा एकदा तोंड फुटण्याची शक्यता आहे.जयंतराव पाटील यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली. शाह हे शरद पवारांना प्रश्न करतात. त्यांच्याबाबत शाह यांना विसर पडलेला दिसतो. त्यांच्याच भाजपच्या सरकारने पवार यांना केंद्रात निमंत्रित करून पद्मभूषण पुरस्कार दिला आहे. याचा त्यांना विसर पडलेला दिसतो.

राज्यातील महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. लोकसभा निवडणूक होईपर्यंत ते अतिशय हवेत होते. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. लोकसभा निवडणूक निकालने ते जमिनीवर आले. लोकसभा निकाल येईपर्यंत महायुतीच्या नेत्यांना गोरगरीब जनतेची आठवण झाली नाही. निकालानंतर सर्व काही आठवले. त्यामुळे आता सर्वच गोष्टी लाडक्या वाटू लागल्या आहेत. गोरगरिबांचे आठवण होऊ लागली आहे. ते लाडके झाले आहेत. मात्र जनता सर्व गोष्टी ओळखून आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT