Nandurbar News: नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित (Supriya Gavit) या सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतात, त्यामुळे सदस्यांमध्ये नाराजी आहे. डॉ. सुप्रिया यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. डॉ. सुप्रिया या आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्षांवर (Nandurbar Zilla Parishad)अविश्वास प्रस्ताव दाखल करणार नाही, असे विरोधी पक्षांनी जाहीर केलं होत, मात्र वाढती नाराजी लक्षात घेत भाजपने राजकीय खेळी केली असल्याचे बोलले जाते. अविश्वास प्रस्ताव पारित न झाल्यास पुढील सहा महिने अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदेची मुदत संपेल म्हणून हि खेळी खेळल्याची चर्चा आहे.
सत्ताधारी भाजपच्या 10 सदस्यांच्या या अविश्वास प्रस्तावावर सह्या आहेत. भाजपा सदस्यांच्या सोबत मागील जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपला साथ देणाऱ्या 7 कॉंग्रेस ,3 राष्ट्रवादी ,शिंदे गटाच्या एका सदस्यांचा सह्या आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्षा विश्वासात घेत नाही, सदस्यांच्या जिल्हा परिषद गटातील विकास कामांना अडथळा निर्माण करतात,अध्यक्षा गावित कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात बोलवत नाही ,सदस्य त्यांना भेटण्यासाठी जातात तेव्हा वेळ देत नाहीत, अशी कारणे देण्यात आली आहेत. डॉ. सुप्रिया गावित यांच्याविरुद्ध भाजपा सदस्यांसह २० जणांनी अविश्वास ठराव जिल्हाधिकारी यांना दिला आहे.
काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय नेत्यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती हेमलता शितोळे, समाज कल्याण सभापती शंकर आमश्या पाडवी यांच्यासह भाजपा सदस्यांनी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्याकडे डॉ. सुप्रिया गावित यांच्याविरुद्ध ठराव दिला आहे.
या ठरावाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी विशेष सभेचे आयोजन केले आहे. या सभेत काय निर्णय होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.