Deepika Chavan & Dilip Barse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dilip Borse Politics: भाजप आमदार दिलीप बोरसे यांच्याकडून सुरू झाले मुलाचे राजकीय पुर्नवसन?

Dilip borse politics; MLA's son Bunty Borse will projected for assembly election, BJP's new politics-बागलाण मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी आमदार दीपिका चव्हाण पुन्हा देणार बोरसे यांना टक्कर.

Sampat Devgire

Barse Vs Chavan News: बागलाण मतदार संघात भाजपचे आमदार दिलीप बोरसे निवडणुकीची तयारी करीत आहेत. मात्र त्यांच्याकडे प्रचाराचा मुद्दा कोणता असेल हे एक गौडबंगाल आहे. त्यामुळे आमदारांचेअनुयायी देखील गोंधळलेले आहेत.

बागलाण हा राजकीयदृष्ट्या अत्यंत जागृत विधानसभा मतदारसंघ आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दीपिका चव्हाण आणि भाजपचे विद्यमान आमदार दिलीप मंगळू बोरसे यांच्यात लढत होत आली आहे. यंदाही हीच पारंपारिक लढत होईल, अशी चिन्हे आहेत.

यामध्ये आमदार बोरसे यांना भाजपची उमेदवारी निश्चित मानली जाते. त्यांनीही तयारी सुरू केली आहे. मात्र यांच्याकडे प्रचाराचा मुद्दा काय?हे अनेकांना अद्याप समजू शकलेले नाही

या निवडणुकीचे वेगळेपण म्हणजे आमदार बोरसे यांनी गेले वर्षभर आपले चिरंजीव हर्षवर्धन उर्फ बंटी यांना प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नुकताच हर्षवर्धनचा वाढदिवस झाला. तो धुमधडाक्यात आणि मतदार संघात सगळीकडे साजरा करण्यात आला.

गणोशोत्सव मंडळांना देणग्यांपासून तर अनेक उपक्रम त्यांच्या मार्फत होत आहेत. त्यामुळे आमदार बोरसे आपल्या मुलाला उमेदवारी मिळवून देणार का? हा देखील चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काहीसे गोंधळलेले दिसतात.

या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी आमदार दीपिका चव्हाण गेली पाच वर्ष आमदार बोरसे यांच्या विरोधात सक्रिय आहेत. मतदारसंघातील प्रत्येक प्रश्नावर आणि राजकीय विषयावर त्या आमदार बोरसे यांना आव्हान देत असतात. यंदा आमदार बोरसे विरुद्ध माजी आमदार चव्हाण यांची लढत निश्चित मानली जाते.

यामध्ये अन्य इच्छुकांनी देखील ते मान्य केल्यासारखेच आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची स्थिती जागा वाटपात या मतदारसंघावर दावा करावा अशी नाही. त्याचबरोबर महायुतीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडे तर उमेदवार म्हणून कार्यकर्ता देखील नाही.

बागलाण हा राजकीय दृष्ट्या अत्यंत जागृत मतदार संघ मानला जातो. उमेदवाराने कोणतेही आणि कितीही दावे केले तरी, येथील मतदार त्याला फारसा प्रतिसाद देत नाहीत. आमदार बोरसे यांनी मतदारसंघासाठी दोन हजार २०० कोटी निधी आणला, असा दावा केला जातो.

आमदारांचा हा निधी कागदावरच दिसतो. मतदार संघातील प्रकल्प किंवा विकास यातून तो मतदारांना दिसलेला नाही. मतदारसंघात हरणबारी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या विस्ताराचा प्रश्न गंभीर आहे. त्याचबरोबर केळझर धरणाच्या चारी क्रमांक आठ चा विस्तार शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. त्यावर फारसे काम झालेले नाही, असा विरोधकांचा आरोप आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काय चित्र असेल याची झलक लोकसभा निवडणुकीत दिसली. लोकसभा निवडणुकीत भाजपचे माजी खासदार डॉ सुभाष भामरे यांची ५१ हजार मताधिक्य येथे कमी झाले. काँग्रेसच्या खासदार डॉ शोभा बच्छाव यांची ही मते वाढली. हाच कल विधानसभा निवडणुकीत राहिल्यास आमदार बोरसे यांना चांगलीच झुंज द्यावी लागेल. त्यामुळे मतदार संघात आमदार बोरसे स्वतः उमेदवारी करणार की मुलाला उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करणार हा चर्चेचा विषय आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT